फ्लोरिडाच्या बास्केटबाॅल स्टेडियमवर 'बाहुबली'ची हवा, व्हिडिओ व्हायरल

फ्लोरिडाच्या बास्केटबाॅल स्टेडियमवर 'बाहुबली'ची हवा, व्हिडिओ व्हायरल

अमेरिकेच्या नॅशनल बास्केटबाॅल असोसिएशन ( NBA)च्या फेसबुक वाॅलवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात बाहुबलीच्या गाण्यावर नृत्य सुरू आहे. या व्हिडिओला कॅप्शन आहे, क्रेझी देसी वाईब्स.

  • Share this:

30 नोव्हेंबर : या वर्षीचा सर्वात हिट सिनेमा बाहुबली थिएटरमधूनही बाहेर पडून बराच काळ लोटला. पण सिनेमाची हवा कायम आहे. अगदी सातासमुद्रापार आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये बाहुबलीची हवा जोरात होती.

अमेरिकेच्या नॅशनल बास्केटबाॅल असोसिएशन ( NBA)च्या फेसबुक वाॅलवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात बाहुबलीच्या गाण्यावर नृत्य सुरू आहे. या व्हिडिओला कॅप्शन आहे, क्रेझी देसी वाईब्स. मॅचच्या आधी हे बाहुबली नृत्य सादर झालं.

या कलाकारांचे पोशाख भारतीय आहेत. सध्या हा व्हिडिओ जाम व्हायरल होतोय. 7 लाखाहून जास्त लोकांनी तो पाहिलाय. बाहुबलीच्या आॅफिशल ट्विटर हँडलवरही हा शेअर झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 02:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading