'टायगर'च्या डरकाळीपुढे 'देवा'चा रंग फिका!

'टायगर जिंदा है' आणि 'देवा' हे सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले होते. मात्र टायगरच्या डरकाळीपुढे देवाची पुरती दैना उडाल्याचं चित्र बॉक्स ऑफिसवर दिसतंय. एककडे टायगर कोटीच्या कोटी उड्डाणं घेत असताना देवावर मात्र अरे देवा म्हणायची वेळ आलीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 27, 2017 11:55 AM IST

'टायगर'च्या डरकाळीपुढे 'देवा'चा रंग फिका!

विराज मुळे, 27 डिसेंबर : 'टायगर जिंदा है' आणि 'देवा' हे सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले होते. मात्र टायगरच्या डरकाळीपुढे देवाची पुरती दैना उडाल्याचं चित्र बॉक्स ऑफिसवर दिसतंय. एककडे टायगर कोटीच्या कोटी उड्डाणं घेत असताना देवावर मात्र अरे देवा म्हणायची वेळ आलीय.

मोठा हिंदी सिनेमा रिलीज होत असताना छोटे सिनेमे सहसा त्याच्या वाटेला जात नाहीत. असं असूनही ख्रिसमस आणि लागून आलेली सुट्टी पाहून 'एक था टायगर'समोर देवा या मराठी सिनेमाने रिलीज होण्याचं धाडस दाखवलं. आधी टायगरमुळे या सिनेमाला थिएटर्स मिळणं अवघड झालं होतं. मात्र मनसेने देवासाठी थिएटर्स मालकांना पत्र लिहून धमकावल्यामुळे अखेर या सिनेमाला २५० थिएटर्स उपलब्ध झाली. मात्र प्रत्यक्षात थिएटर्स मिळूनही देवाला बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडता आली नाही.

देशभरात तब्बल ४६०० स्क्रिन्सवर रिलीज झालेल्या टायगरने पहिल्याच दिवशी ३४ कोटी १० लाखांचं बंगर ओपनिंग मिळवलं, तर त्याच दिवशी देवाला जेमतेम १० लाखांचं ओपनिंग मिळालं. शनिवारी टायगरने पुन्हा मुसंडी मारत ३५ कोटी ३० लाखांचं कलेक्शन मिळवलं तर देवाचं कलेक्शन दुसऱ्या दिवशी घसरून अवघ्या ७ लाखांवर आलं.

रविवारी टायगरने ४५ कोटी ५३ लाखांचं कलेक्शन मिळवलं तर देवाची परिस्थिती याहून खराब होऊन त्याने जेमतेम  साडेतीन लाख रूपये कमावले.म्हणजेच ज्या तीन दिवसात टायगरने ११४ कोटी बॉक्स ऑफिसवर वसूल केले त्याच तीन दिवसात देवाचं कलेक्शन जेमतेम २० लाखांच्या वर जाऊ शकलेलं नाही.टायगरची घोडदौड अशीच सुरू राहिली तर देवा पुढच्या आठवड्यात टिकणं जवळपास अशक्य आहे.

बाॅक्स आॅफिस काय म्हणतंय?            

Loading...

                     टायगर जिंदा है               देवा

शुक्रवार       ३४ कोटी १० लाख           १० लाख

शनिवार       ३५ कोटी ३० लाख           ७ लाख

रविवार        ४५ कोटी ५३ लाख         ३.५ लाख

एकूण         ११४ कोटी ९३ लाख          २० लाख

टायगरपुढे देवा अवघे तीन दिवसही तग धरू शकला नाही हेच अंतिम सत्य आहे. त्यामुळे मराठी सिनेमा रिलीज होऊन प्रेक्षकच तो नाकारत असतील तर मनसेने आंदोलन करून नक्की काय साध्य होणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2017 11:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...