अभिनेता दिलीप कुमार यांचे धाकटे भाऊ असलम खान यांचे कोरोनामुळे निधन

अभिनेता दिलीप कुमार यांचे धाकटे भाऊ असलम खान यांचे कोरोनामुळे निधन

हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांच्या (Dilip Kumar) यांच्या कुटुंबातून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू असलम खान (Aslam Khan) यांचा कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑगस्ट : हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांच्या (Dilip Kumar) यांच्या कुटुंबातून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू असलम खान (Aslam Khan) यांचा कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाला आहे. ते 90 वर्षांचे होते. असलम खान यांना शुगर, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा त्रास होता. काही दिवसांपूर्वीच ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.

त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण कुटुंबीयांवर आणि मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. असलम खान यांचे भाऊ एहसास खान हे देखील लीलावती रुग्णालयामध्ये भरती आहेत. एहसास खान देखील कोरोना संक्रमित आहे. दरम्यान एहसास यांची तब्येत देखील गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. एहसास यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे.

दिलीप कुमार यांचे दोन्ही बंधू एहसास आणि असलम यांचे कोरोना रिपोर्ट काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. असलम आणि एहसास दोघांनाही श्वसनाचा त्रास होत होता.

(हे वाचा-एस. पी. बालसुब्रमण्यम अद्याप व्हेंटिलेटरवर; रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन केलं जारी)

असलम खान यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे एहसास यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली जात आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 21, 2020, 11:27 AM IST

ताज्या बातम्या