Home /News /entertainment /

गायत्री मंत्राचा जप करत अक्षय कुमारने ठेवलं नववर्षात पाऊल; पाहा अभिनेत्याचा VIRAL VIDEO

गायत्री मंत्राचा जप करत अक्षय कुमारने ठेवलं नववर्षात पाऊल; पाहा अभिनेत्याचा VIRAL VIDEO

अभिनेत्याने गायत्री मंत्राचा जाप करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा (Akshay Kumar New Year) दिल्या आहेत. अक्षय कुमारचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे.

  मुंबई, 1 जानेवारी-   बॉलिवूड  (Bollywood)  खिलाडी अक्षय कुमार  (Akshay Kumar)  नेहमीच आपल्या हटके अंदाजाने चाहत्यांचं मन जिंकतो. चाहत्यांना त्याचा हा हटके अंदाज फारच पसंत पडतो. आज पुन्हा एकदा अक्षय कुमारने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. अभिनेत्याने गायत्री मंत्राचा जाप करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा   (Akshay Kumar New Year)  दिल्या आहेत. अक्षय कुमारचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या मालदीवमध्ये आहे. अभिनेता आपली पत्नी ट्विंकल खन्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेला आहे. अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार आपल्या समुद्रकिनारी असलेल्या कॉटेजसमोर सूर्याकडे तोंड करून उभा असलेला दिसत आहे. विशेष बाब म्हणजे अभिनेता सूर्याला नमस्कार करून गायत्री मंत्राचा जप करत आहे. गायत्री मंत्राचा जाप करत अभिनेत्याने सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

  अक्षय कुमारच्या चाहत्यांना त्याचा हा हटके अंदाज फारच भावला आहे. चाहते व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. तसेच अभिनेत्याला आणि त्याच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच अक्षय कुमारने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'नवीन वर्ष, तोच मी.. मी सकाळी उठलो आणि माझा जुना मित्र सूर्य त्याला मी नमस्कार केला. मी माझ्या २०२२ च्या सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह गोष्टींनी केली आहे, फक्त कोरोना सोडून'. सगळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना.. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा'. असं म्हणत अक्षयने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तसेच अक्षयने दोन दिवसांपूर्वी आपल्या पत्नीसोबतचा खास फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. नुकतंच अक्षयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालदीवचे आपले काही व्हिडीओही शेअर केले होते. यामध्ये अक्षय मालदीवच्या निसर्गरम्य वातावरणात सायकलिंगचा आनंद घेताना दिसून आला होता. त्याचे हे व्हिडीओ चाहत्यांना फारच पसंत पडले होते. तसेच हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. अक्षय कुमार बऱ्याच दिवसांनंतर व्हेकेशनवर गेलेलं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयच्या आईचं निधन झालं होतं. परंतु त्याच्या अवघ्या दोन दिवसांतच अक्षय आपल्या कामावर परतला होता. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या या धाडसाचं कौतुक केलं होतं. तर नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोलदेखील केलं होतं.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Akshay Kumar, Entertainment

  पुढील बातम्या