असित मोदींच्या मनाचा मोठेपणा; सुट्टीतही मिळतंय ‘तारक मेहता’मधील कलाकारांचं मानधन

असित मोदींच्या मनाचा मोठेपणा; सुट्टीतही मिळतंय ‘तारक मेहता’मधील कलाकारांचं मानधन

अनेकदा पैशाची नाही तर मनाची श्रीमंती असावी लागते, आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे (Tarak Mehta Ka Oolta Chashma) निर्माते असित मोदीं याला अपवाद ठरले आहेत. कोरोनाच्या या कठीण काळातही त्यांनी कलाकरांना पोरकं केलं नाही.

  • Share this:

मुंबई 10 मे :  गेल्या वर्षभरापासून लॉकडाउनचा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसत आहे. अनेक जन यामुळे हवाल दिल झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींना अर्धाचं पगार मिळू लागला. पण अनेकदा पैशाची नाही तर मनाची श्रीमंती असावी लागते, आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे (Tarak Mehta Ka Oolta Chashma) निर्माते असित मोदीं (Asit kumar Modi) याला अपवाद ठरले आहेत. कोरोनाच्या या कठीण काळातही त्यांनी कलाकरांना पोरकं केलं नाही.

मागील वर्षी प्रमाणेच या ही वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्वामुळे लॉकडाउन करण्यात आला आहे त्यामुळे मालिकांचं चित्रिकरण थांबलं. तर निर्मात्यांनी यावर पर्याय शोधत राज्याबाहेर शुटींग करणं पसंत केलं. अनेक मालिका सध्या राज्याबाहेरच शुट होत आहे. तर सर्वांची लाडकी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही गुजरात मध्ये शुट होत आहे.

खबरदारी घेऊन तसेच नियम पाळूनही अनेकांना करोनाची लागण होत आहे. अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत तर काही कलाकारांकडे काहीच काम नसल्याने घरी बसण्याची वेळ आली आहे. सध्या शुटींग बाहेर सुरू असल्याने कथानकात ज्या कलाकारांची गरज आहे तेच कलाकार आता तिथे उपस्थित आहेत व काम करत आहेत. व बाकीच्यांना मात्र सुट्टी आहे.  अभिनेते शरद शंकला म्हणजेच मालिकेतील अब्दूल यांनी एका मुलाखतीत सांगितले, " सध्या सुरु असलेल्या कथानकात माझ्या भूमिकेसाठी काम नव्हते. त्यामुळे मी घरीच आहे.काम नसले म्हणून माझे मानधन थांबले नाही. नियमितपणे माझ्या अकाऊंटमध्ये मानधन जमा होत आहे."

पुढे शरद यांनी सांगितले की, "असित मोदी यांच्या सारखे निर्माते आम्हाला लाभले आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांच्यामुळेच आम्हाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही." याशिवाय नट्टू काका हे पात्र साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांना मागील वर्षी कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यामुळे ते अगदी 5 ते 6 एपिसोड्स मध्येच दिसले होते. पण तरीही त्यांच मानधन त्यांना मिळत होत. तर त्यानंतरही सगळ्या कलाकारांच मानधन सुरू आहे.

अनेक मालिका या लॉकडाउच्या संकटाने बंद पडल्या तर अनेक कलाकार हे बेरोजगार झाले. पण अशातही असित मोदींसारखे निर्माते कलाकारांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. यामुळे आता असित मोदी यांच कौतुक होत आहे.

Published by: News Digital
First published: May 13, 2021, 7:25 PM IST

ताज्या बातम्या