VIDEO : Bigg Boss च्या घरात बॉयफ्रेंडला विसरली हिमांशी, आसिमला केलं KISS

VIDEO : Bigg Boss च्या घरात बॉयफ्रेंडला विसरली हिमांशी, आसिमला केलं KISS

bigg boss 13 च्या घरात असिम रियाझ आणि हिमांशी खुराना यांच्यात मागच्या काही दिवसांपासून जवळीक वाढताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : बिग बॉसचं घर एक अशी जागा आहे ज्याठिकाणी प्रेम आणि द्वेष दोन्ही व्हायला वेळ लागत नाही. मागच्या काही दिवसांपासून घरात जोरदार ड्रामा सुरू असला तरीही अधून-मधून प्रेमाचे कारंजे उडतानाही दिसत आहेत. पंजाबची ऐश्वर्या राय म्हणजे हिमांशी खुराना काही दिवसांपासून खूप सक्रिय झालेली दिसत आहे. तसेच असिम रियाझ आणि तिच्यात मागच्या काही दिवसांपासून जवळीक वाढताना दिसत आहे. त्यांच्यातील बॉन्डिंग पाहता सध्या हिमांशी घराबाहेर असलेल्या तिच्या बॉयफ्रेंडला विसरल्याचं दिसत आहे. यामुळेच की काय असिमला नेहमी दूर ठेवणारी हिमांशी नुकत्याच प्रसारित झालेल्या प्रोमोमध्ये त्याला किस करताना दिसली.

नुकत्याच कलर्स टीव्हीच्या ऑफिशियल सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आलेल्या एका प्रोमोमध्ये हिमांशी आणि आसिम एकमेकांना किस करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर हिमांशीच्या वाढदिवसाला आसिम तिला हार्ट शेपवाला पराठा देताना दिसत आहे आणि याचवेळी हिमांशी आसिमला किस करताना दिसत आहे. आता या दोघांमध्ये वाढत असलेली जवळीक मात्र प्रेक्षकांसाठी धक्कादायक आहे.

रानू मंडल यांनी हिंदीनंतर गायलं थेट मल्याळम गाणं, VIDEO VIRAL

खरं तर हिमांशी शोमध्ये आल्याआल्याच आसिमनं तिचं कौतुक करायला सुरुवात केली होती. पण हिमांशी मात्र मला हे असं काही आवडत नाही, मी एंगेज आहे, माझा बॉयफ्रेंड आहे, त्यामुळे आसिमला सांग की माझ्यासोबत असं काही करू नये. असं शेफालीकडे बोलताना दिसली होती. पण आता असं वाटतं की, आसिमचा क्यूटनेस पाहून हिमांशी त्याच्याकडे आपलं मन मोकळं करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांआधीच आसिम त्याच्या भावना हिमांशीकडे बोलून दाखवताना दिसला होता.

ड्रग्जसाठी अस्वस्थ व्हायचा अभिनेता, दोनदा समुपदेशन केंद्रात करावं लागलं भरती

'मजा डबल करने आ रही हूँ', सनी लिओनीने शेअर केला VIDEO

Published by: Megha Jethe
First published: November 28, 2019, 3:36 PM IST
Tags: bigg boss

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading