Asif Basra Suicide: आसिफच्या आत्महत्येमुळे बॉलिवूड पुन्हा हादरलं; दिग्गज कलाकारांनी व्यक्त केल्या भावना...

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आसिफ बसरा (Asif Basra Suicide) याने गुरुवार गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर मनोज वाजपेयींपासून स्वरा भास्करपर्यंत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आसिफ बसरा (Asif Basra Suicide) याने गुरुवार गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर मनोज वाजपेयींपासून स्वरा भास्करपर्यंत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

  • Share this:
    मुंबई, 12 नोव्हेंबर : बॉलिवूडला (Bollywood) आज पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. गुरुवार 12 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेता आसिफ बसरा (Asif Basra Suicide)याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सांगितले जात आहे की, 53 वर्षीय अभिनेता आसिफ डिप्रेशनमध्ये होता. अद्याप त्यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण समोर आलेलं नाही. तर त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीला मोठा झटका बसला आहे. आसिफ बसराच्या आत्महत्येची बातमी ऐकून अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. ही बातमी ऐकून सर्वजण हैराण झाले आहेत, कोणाही या बातमीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. आसिफच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे. तर अनेक बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. फिल्ममेकर हंसल मेहता यांना इतका झटका बसला की त्यांनी ही बातमी खरी असल्याचे मानण्यास नकार दिला. त्यांनी लिहिलं की,  'आसिफ बसरा! हे सत्य असू शकत नाही...ही अत्यंत दु:खदायक बातमी आहे. याशिवाय अभिनेता मनोज वाजपेयी यांनी या बातमीवर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी लिहिलं- काय? ही अत्यंत हैराण करणारं बातमी आहे!! मी लॉकडाउनपूर्वी त्यांच्यासोबत शूट केलं होत. ओह माय गॉड'. याशिवाय अभिनेत्री स्वरा भास्करनेही ट्विट केलं आहे..तिने लिहिलं आहे- 'noooooooooo'
    Published by:Meenal Gangurde
    First published: