आशियाई फिल्म फेस्टिवलमध्ये सुबोध-मृणाल म्हणतायत 'वेलकम होम'

आशियाई फिल्म फेस्टिवलमध्ये सुबोध-मृणाल म्हणतायत 'वेलकम होम'

उद्यापासून ( 14 डिसेंबर ) आशियाई फिल्म फेस्टिवल सुरू होतोय. 17व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात मुंबईकर प्रेक्षकांना गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाद मिळालेले चित्रपट आणि लघुपटांचा आस्वाद घेता येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर :  उद्यापासून ( 14 डिसेंबर ) आशियाई फिल्म फेस्टिवल सुरू होतोय.  17व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात मुंबईकर  प्रेक्षकांना गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाद मिळालेले चित्रपट आणि लघुपटांचा आस्वाद घेता येणार आहे. अर्जुन दत्ता या बंगाली दिग्दर्शकाचा  ‘अव्यक्तो’  हा चित्रपट आणि शेखर बापू रानखांबेचा 'पॅम्पलेट' हा तीस मिनिटांचा  लघुपट आशियाई महोत्सवात प्रदर्शित होणार आहेत.

‘अव्यक्तो’ ही इंद्र नावाच्या तरुणाची कथा आहे. त्याची आई साथी, वडील  कौशिक आणि  त्याचा मित्र रुद्र जे त्याचे लाडके काका आहेत. या तीन व्यक्तिरेखेच्या संमिश्र नातेसंबंधातून इंद्राची झालेली मानसिक जडणघडण आपल्याला 'अव्यक्तो' मध्ये पाहायला मिळते.

शेखर बापू रानखांबेच्या 'पॅम्पलेट' मधील  हा एक स्वछंद मुलगा आहे. तो अभ्यासापेक्षा पतंग उडवण्यात अधिक रमतो. त्याच्या हाती एक व्यक्ती पॅम्पलेट देते. या पॅम्प्लेटच्या झेरॉक्स काढून वाटल्या नाहीत तर तुझा घरावर अरिष्ट येईल. अशी भीती त्याचा मित्र त्याला घालतो. ह्या घटनेने भावविश्व ढवळून निघते, समाजातील अंधश्रद्धेवर पॅम्प्लेट नेमकेपणाने बोट ठेवतं

या दोन कलाकृतींच्या बरोबरीने अनेक लघुपट महोत्सवात यशस्वी ठरलेले गोची ( दिग्दर्शक प्रियाशंकर  घोष ), प्रॉन्स (दिग्दर्शक स्वप्नील शेट्ये ), द ड्रेनेज (दिग्दर्शक विक्रांत रामदास ), परसेप्टिव्ह (दिग्दर्शक आदिनाथ कोठारे), बेहरुपीया (दिग्दर्शक पंकज बंगधडे ), द  नॉट  (दिग्दर्शक पंकज बांगडे ) हे लघुपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

मोबाईलच्या आसक्तीमुळे  संपर्क तुटलेला नायक (नंदू माधव) आपल्याला द ड्रेनेजमध्ये आपल्याला पाहता येईल. ‘परसेप्टिव्ह’मधून आदिनाथ कोठारेने धार्मिक सोहळ्यांकडे पाहण्याचा आगळा वेगळा दृष्टिकोन चित्रित  केला आहे. ओली अंडरवेअर वाळवंताना चुकून घर मालकाच्या छपरावर पडल्यानंतर ती काढताना नायकाची झालेली गोची आपल्याला मनमुराद हसू  येईल. मुलाला शिकवायला  हवं या निर्णयापर्यन्त आलेला एक  मच्छिमार आपल्याला प्रॉन्झमध्ये भेटेल.

यंदाचं वर्ष ग. दि. माडगूळकर, पुल देशपांडे आणि सुधीर फडके या दिग्ग्ज कलावंताचं जन्मशताब्दी वर्ष  आहे. याचं औचित्य साधून १९५० साली प्रदर्शित झालेला 'पुढचं पाऊल' हा राजपरांजपे दिग्दर्शित चित्रपट महोत्सवातील सेंटर पीस म्हणून दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाची पटकथा, गीतं, ग. दि. माडगूळकर यांनी  लिहिली असून सुधीर फडकेनी संगीत दिलं आहे.  पुल देशपांडे आणि ग. दि. माडगूळकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

'वेलकम होम' या मराठी चित्रपटाने महोत्सवाचं उद्घाटन होईल. सुमित्रा भावे आणि सुनील सुखटनकर दिग्दर्शक असून त्यात मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, सुबोध भावे यांच्या भूमिका आहेत. महोत्सवात इटलीचे स्पेगेटी वेस्टर्न, महिला दिग्दर्शक, स्पेक्ट्रम आशिया, इंडियन व्हिस्टा असे सेक्शन आहेत.

#TRPमीटर : विक्रांत सरंजामेवर भारी पडल्या पाठकबाई

First Published: Dec 13, 2018 05:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading