News18 Lokmat

कॅलिफोर्नियात अश्विनी भावे रंगलीय फेस्टिवलमध्ये!

अभिनेत्री अश्विनी भावे कॅलिफोर्नियामध्ये सेटल झालीय. अधेमधे ती भारतात येत असते. पण सध्या ती तिच्या कुटुंबाबरोबर तिथे चांगलीच रमलीय. वेगवेगळे फेस्टिवल ती एंजाॅय करतेय.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2018 03:50 PM IST

कॅलिफोर्नियात अश्विनी भावे रंगलीय फेस्टिवलमध्ये!

मुंबई, 4 नोव्हेंबर : अभिनेत्री अश्विनी भावे कॅलिफोर्नियामध्ये सेटल झालीय. अधेमधे ती भारतात येत असते. पण सध्या ती तिच्या कुटुंबाबरोबर तिथे चांगलीच रमलीय. वेगवेगळे फेस्टिवल ती एंजाॅय करतेय.


कॅलिफोर्नियात नुकताच पमकिन फेस्टिवल झालाय. अश्विनी सांगते, ' हा खूपच मजेशीर फेस्टिवल असतो. यात वेगवेगळ्या आकाराचे भोपळे विकायला असतात. तुम्ही तिथे जाऊन धमाल करू शकता आणि ते भोपळे हॅलोविन फेस्टिवलसाठी घेतले जातात. ते घरासमोर ठेवले जातात.'


हा हॅलोविन फेस्टिवल आहे तरी काय? यावर अश्विनी सांगते, ' 31 आॅक्टोबर हा जगात हॅलोविन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही भयानक वेशभूषा करायची. सगळ्यांना घाबरावयाचं.'

Loading...


अश्विनी एक आठवण सांगते. ती म्हणाली, मुलं लहान होती तेव्हा मी हडळीचा आवाज काढून त्यांना घाबरवायची. आजही मुलं त्या आवाजाला घाबरतात.


अश्विनी सांगते, 'कॅलिफोर्नियात आता फेस्टिवलचा मोसम असतो. हॅलोविननंतर थँक्सगिव्हिंग, ख्रिसमस, न्यूइयर असे फेस्टिवल सुरू होतात.'


अश्विनी भावेनं काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकरबरोबर लग्न केलं आणि ती तिथे सेटल झाली. मूळचे महाराष्ट्रीयन असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर बोपर्डीकर यांच्याशी अश्विनी यांनी लग्न केले. किशोर हे एका इंटरनॅशनल कंपनीचे मालक आहेत. अश्विनी यांना दोन मुले आहेत अगदी अलिकडे तिनं मांजा, ध्यानीमनी हे सिनेमे केले होते.


मांजा हा आई-मुलाच्या नात्यावरचा सिनेमा होता. तर ध्यानीमनी सिनेमात महेश मांजरेकरांबरोबर तिनं सुंदर अभिनय केला होता. ध्यानीमनी नाटकावर बेतला होता.बाॅलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टच्या यशाचा 'हा' आहे फंडा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2018 03:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...