Home /News /entertainment /

'श्रद्धेमुळं हे साध्य झालं...' फेसबुकला परत आणावा लागला आशुतोष राणांचा 'शिवतांडव' Video; अभिनेत्याची भावुक पोस्ट

'श्रद्धेमुळं हे साध्य झालं...' फेसबुकला परत आणावा लागला आशुतोष राणांचा 'शिवतांडव' Video; अभिनेत्याची भावुक पोस्ट

महाशिवरात्रीच्या भक्तीपूर्ण वातावरणात अभिनेते आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांचा 'शिवतांडव स्तोत्र' (Shiva Tanadva Video) व्हिडीओ फारच चर्चेत आला होता. या व्हिडीओला नेटकऱ्यांच प्रचंड प्रेम मिळालं होतं.

    मुंबई, 3 मार्च-   महाशिवरात्रीच्या भक्तीपूर्ण वातावरणात अभिनेते आशुतोष राणा   (Ashutosh Rana)  यांचा 'शिवतांडव स्तोत्र'  (Shiva Tanadva Video)  व्हिडीओ फारच चर्चेत आला होता. या व्हिडीओला नेटकऱ्यांच प्रचंड प्रेम मिळालं होतं. चाहते या व्हिडीओचा प्रचंड आनंद घेत होते. परंतु नंतर आशुतोष राणा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चाहत्यांना सांगितलं की, फेसबुकने   (Facebook)  त्यांचा हा व्हिडीओ या आपल्या टाइमलाईनमधून डिलीट केला आहे. त्यांनतर फेसबुकला नेटकऱ्यांचा प्रचंड रोष सहन करावा लागला. त्यांनतर पुन्हा फेसबुकला हा व्हिडीओ परत आणावा लागला आहे. या व्हिडीओमध्ये आशुतोष राणा यांनी अगदी साध्या-सोप्या पद्धतीने आणि त्याच चालीत शिवतांडव स्तोत्र गायिला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर प्रत्येकालाच हा व्हिडीओ प्रचंड पसंत पडला होता. चाहते या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद देत होते. परंतु आपल्या फेसबुकवरून हा व्हिडीओ गायब झाल्याने आशुतोष राणा प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी आपली नाराजी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्तदेखील केली होती. ट्विटरवर नाराजी व्यक्त करत आशुतोष राणा यांनी लिहिलं होतं, 'मी चकित झालोय. कारण फेसबुकने माझा शिवतांडव स्तोत्र व्हिडीओ फेसबुक टाईमलाईनवरून हटवला आहे. @Metaindia ने असं का केलं? कारण या व्हिडीओमध्ये कोणत्याही प्रकारच्या कॉपीराईटचा इश्यू नाही किंवा इतरही काही मुद्दा नाहीय. आणि प्रमुख म्हणजे हा व्हिडीओ फेसबुकच्या नियमांविरुद्धही नव्हता'. त्यांच्या या ट्विटवर हजारो लोकांनी रिट्विट केलं आहे. फेसबुकच्या या निर्णयावर अनेकांनी रोष व्यक्त केला होता. त्यांनतर आता आशुतोष राणा यांनी माहिती देत आपला हा व्हिडीओ पुन्हा फेसबुकवर ऍड केल्याचं सांगितलं आहे. त्यांनी लिहिलं आहे, 'महादेवाच्या स्तुतीचा माझा जो व्हिडीओ फेसबुकने हटवला होता. तो पुन्हा एकदा त्यांनी आपल्या टाईमलाईनमध्ये आणला आहे. हे सर्व काही तुमच्यासारख्या प्रियजन, महादेवभक्त आणि प्रेमळ लोकांच्या प्रेम, माया, राग, दबाव आणि विश्वासामुळेच शक्य झालं आहे. खूप धन्यवाद, हर हर महादेव'.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actor, Entertainment, Facebook

    पुढील बातम्या