S M L
Football World Cup 2018

आशुतोष गोवारीकरांच्या 'पानिपत'चं पोस्टर रिलीज

भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या पानिपतच्या तिसर्‍या लढाईवर प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर सिनेमा तयार करतायेत.

Sonali Deshpande | Updated On: Mar 14, 2018 02:38 PM IST

आशुतोष गोवारीकरांच्या 'पानिपत'चं पोस्टर रिलीज

14 मार्च : भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या पानिपतच्या तिसर्‍या लढाईवर प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर सिनेमा तयार करतायेत. ६ डिसेंबर २०१९ रोजी ही सिनेमा प्रदर्शित करण्याची तारीख देखील त्यांनी पहिल्या पोस्टरमधून जाहीर केलीय.

या सिनेमात संजय दत्त, अर्जुन कपूर,कृती सनाॅन  प्रमुख भूमिकेत आहेत. पानिपतची तिसरी लढाई मराठा साम्राज्य विरूद्ध अफगाण सेनानी अहमद शहा अब्दाली यांच्यात २५५ वर्षापूर्वी  झाली होती.

आशुतोष गोवारीकर यांनी ट्विटरवर या सिनेमाची माहिती दिलीय. त्यांनी म्हटलंय, ऐतिहासिक नाट्याचं मला नेहमीच आकर्षण आहे. लगान, स्वदेस, जोधा अकबर, मोहंजोदाडो अशा सिनेमांमधून त्यांनी नेहमीच आपला वेगळा ठसा उमटवलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close