मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुपरस्टार अशोक सराफ करायचे बँकेत काम; वडिलांच्या विरोधात जाऊन सोडली नोकरी

सुपरस्टार अशोक सराफ करायचे बँकेत काम; वडिलांच्या विरोधात जाऊन सोडली नोकरी

कोट्यवधींचे मालक अशोक सराफ कधीकाळी बँकेत करायचे नोकरी; जाणून घ्या का सोडलं होतं काम

कोट्यवधींचे मालक अशोक सराफ कधीकाळी बँकेत करायचे नोकरी; जाणून घ्या का सोडलं होतं काम

कोट्यवधींचे मालक अशोक सराफ कधीकाळी बँकेत करायचे नोकरी; जाणून घ्या का सोडलं होतं काम

मुंबई 4 जून: अशोक सराफ (Ashok Saraf) हे भारतीय मनोरंजनसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात चौफेर कामगिरी करणारे अशोक सराफ गेली तीन-चार दशकं सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल आज एका चित्रपटासाठी कोट्यवधींचं मानधन घेणारे अशोक सराफ कधीकाळी बँकेत नोकरी करत होते. (Ashok Saraf birthday) पण अभिनय करता यावा यासाठी त्यांनी वडिलांच्या विरोधात जाऊन नोकरी सोडली होती.

अशोक सराफ यांचा जन्म 1947 साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. ते मुळचे बेळगावचे असून दक्षिण मुंबईच्या चिखलवाडी भागात त्यांचं बालपण गेलं. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. वयाच्या 18 व्या वर्षी वि. वा. शिरवाडकरांच्या ‘ययाती’ आणि ‘देवयानी’ या नाटकांमधून त्यांनी अभिनयसृष्टीत पदार्पण केलं. त्यांना अभिनय चांगला जमत असला तरी पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी एखादी नोकरी करावी अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती. शिवाय बिझनसमॅन होऊन भरपूर पैसे कमवावे अशीही इच्छा वारंवार त्यांचे वडील व्यक्त करायचे. त्यामुळं वडिलांच्या इच्छेखातर आणि आर्थिक तजवीजीसाठी त्यांनी बँकेत नोकरी करायला सुरुवात केली. पण त्यांचं तिथं मन रमेना ते वारंवार सुट्या काढून कधी हाफ डे घेऊन, तर कधी नातेवाईकाचा मृत्यू झालाय असं कारण सांगून थेट नाटकाचे प्रयोग करण्यासाठी जायचे.

अशोक सराफ यांना ‘मामा’ हे नाव कसं पडलं? पाहा टोपण नावाचा रंजक किस्सा

अखेर त्यांची अभिनेता होण्याची इच्छा आणि त्यासाठी सुरु असलेली धडपड पाहून त्यांच्या वडिलांचं मन बदललं. त्यांनी अशोक सराफ यांना अभिनयात करिअर करण्याची मुभा दिली. अर्थात अभिनयसृष्टीत ते प्रामाणिकपणे काम करतील असंही वचन त्यांनी घेतलं. अन् या वचनाचं आजतागायत पालन ते करत आहेत. चला हवा येऊ द्या या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले होते, “वडिलांच्या इच्छेप्रमाणे मी बिझनसमॅन नाही झालो पण बिझनसमॅनप्रमाणे पैसे आणि त्याहून जास्त प्रसिद्धी मी मिळवली.”

First published:
top videos

    Tags: Actor, Bollywood actor, Marathi cinema