मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अशोक सराफ यांची लाडक्या लेकीला खास गिफ्ट, सायली संजीवला मायेची ऊब म्हणून दिली 'ही' भेट

अशोक सराफ यांची लाडक्या लेकीला खास गिफ्ट, सायली संजीवला मायेची ऊब म्हणून दिली 'ही' भेट

अशोक सराफ यांनी अभिनेत्री सायली संजीवला आपली मुलगी मानलं आहे.

अशोक सराफ यांनी अभिनेत्री सायली संजीवला आपली मुलगी मानलं आहे.

निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांनी अभिनेत्री सायली संजीवला आपली मुलगी मानलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 मार्च- नुकताच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार सोहळा अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यासाठी खूप खास होता. त्याचप्रमाणे अभिनेत्री सायली संजीव हिच्यासाठी देखील तितकाच खास आणि स्पेशल असा होता. याला कारणही तसंच आहे. तिला या सोहळ्यात कोणता पुरस्कार मिळाला नव्हता पण तिला अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्याकडून एक खास गिफ्ट मिळाली होती. ती गिफ्ट काय होती याचा खुलासा नुकताच सायली संजीवनं या मुलाखतीत केला होता.

निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांनी अभिनेत्री सायली संजीवला आपली मुलगी मानलं आहे.सायली सुद्धा अशोक सराफ आणि निवेदिता यांना आदर देते व त्यांच्यावर भरभरून प्रेम करते. नुकतीच अशोक सराफ आणि निवेदिता यांनी आपल्या लाडक्या लेकीला एक खास भेट दिली. ती भेट सायलीला देखील खूप आवडली आहे. तिनं राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.

वाचा-परिणीती चोप्रा अन् आप नेत्याची लगीनघाई?दोन्ही कुटुंबात लग्नाच्या तयारीला सुरुवात

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सायली म्हणाली की,आज मी नेसलेल्या पैठणीची खासियत अशी आहे की, ही साडी मला अशोक पप्पा व निवेदिता मम्मा यांनी दिली आहे. त्यांनी ही साडी खास माझ्यासाठी विणून घेतली होती त्यामुळे ती माझ्यासाठी आणखीन स्पेशल आहे. आतापर्यंत त्यांनी मला कधीही या साडीत पाहिलेलं नाही त्यामुळे ही खास साडी त्यांना दाखवायला नेसून आले असल्याचं तिनं यावेळी सांगितलं.

सायलीने झी चित्र गौरव पुरस्कार 2023 साठी खास निळ्या रंगाची साडी नेसली होती. त्या साडीला सोनेरी पदर आहे. या साडीवर गुलाबी रंगाचं ब्लाउज तिने घातलं असून त्या ब्लाउजवर सोनेरी रंगाचं डिजाईन आहे. या साडीत सायली खूपच सुंदर देखील दिसत आहे. बापानं आपल्या लेकीला खास मायेची ऊब म्हणून साडी भेट दिली आहे. याऊन मोठी गिफ्ट कोणत्याही मुलीसाठी असुच शकत नाही.

>

सायली संजीव सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. छोडा पडदा ते मोठा पडदा असा सायलीचा प्रवास नक्कीच कौतुकास्पद असा आहे. तिच्य़ा पैठणी सिनेमाला देखील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सायलीच्या अभिनयाचे कौतुक झाले. याशिवाय सायली तिच्या फोटोशूटमुले देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment