मित्र असावा तर राज ठाकरेंसारखा - अशोक चव्हाण

येत्या आठवड्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशोक चव्हाण आणि महेश मांजरेकर. या दोघांसोबत मकरंद अनासपुरे बऱ्याच गप्पा मारणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2018 05:21 PM IST

मित्र असावा तर राज ठाकरेंसारखा - अशोक चव्हाण

मुंबई, 12 आॅक्टोबर : कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रम सध्या बराच चर्चेमध्ये आहे. आजवर कार्यक्रमामध्ये नामवंत कलाकारांनी आणि इतर क्षेत्रामधील दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली. या दरम्यान त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच माहिती नसलेल्या गोष्टी प्रेक्षकांना कळल्या, तसंच त्यांची दुसरी बाजू प्रेक्षकांना बघायला मिळाली. या मंडळींनी मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या.

येत्या आठवड्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशोक चव्हाण आणि महेश मांजरेकर. या दोघांसोबत मकरंद अनासपुरे बऱ्याच गप्पा मारणार आहे. तसंच या दोघांनाही बरेच बेधडक प्रश्न देखील विचारले जाणार आहे. दसऱ्याला या खास मुलाखती रंगणार आहेत.

अशोक चव्हाण यांनी मकरंद अनासपुरे यांच्या प्रश्नांची उत्तरं एकदम रोखठोक आणि बेधडकपणे दिली. शाळेमध्ये असताना अशोक चव्हाण गणितामध्ये जरा कच्चे होते पण मग राजकीय गणितं एवढ्या मोठ्या प्रमाणात कशी सांभाळता ? हा प्रश्न विचारला असता त्यांचं उत्तर ऐकण्यासारखे आहे. “मी राजकीय गणितात देखील कच्चाच आहे, पक्का नाही झालो. मला कधीच खरा आणि खोटा चेहरा हा प्रकार जमला नाही... मी माझ्या मतदार संघातील लोकांना आणि सहकाऱ्यांसाठी अव्हेलेबल असतो. राजकारणात खोटं बोलणं सोयीचं आहे. समोर एक बोलतात आणि मागे दुसरंच बोलतात हे आम्हाला माहिती असतं. पण आम्हाला हे जमलं नाही. जे तोंडावर आहे तेच माघारी पण आहे,” असं ते म्हणाले.

#MeTooच्या सुनावणीसाठी लवकरच एक न्यायिक समिती - मनेका गांधी

सुकन्याची 'माई' सांगतेय आपल्या लाडक्या लेकीबद्दल

Loading...

20 वर्षांनंतर प्रशांत दामले-कविता मेढेकर सांगतायत संसाराची 'पुढची गोष्ट'

कार्यक्रमामधील चक्रव्ह्यू राउंडमध्ये मकरंद अनासपुरे यांनी  अशोक चव्हाण आणि महेश मांजरेकर यांना काही प्रश्न विचारले ज्याची उत्तरं दोघांनीही बिनधास्तपणे दिली. अशोक चव्हाण यांना या राउंडमध्ये राजकीय क्षेत्रातील काही व्यक्तींसंदर्भात प्रश्न विचारले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक आवडणारी आणि एक नावडती गोष्ट, तर कोणाचा कारभार जास्त पारदर्शक आहे,  नरेंद्र मोदी की देवेंद्र फडणवीस, उत्तम वक्ता कोण, राहुल गांधी की नरेंद्र मोदी?

याच राउंडमध्ये राज ठाकरे यांबद्दल बोलत असताना अशोक चव्हाण म्हणाले “मित्र असावा तर राज ठाकरेंसारखा” या कार्यक्रमामध्ये मकरंदनं अशोक चव्हाण यांना पेट्रोल पंपावर माननीय पंतप्रधान यांचे फोटो बघून तुम्हाला काय वाटतं? असं विचारलं तेव्हा ते म्हणाले, “आज एकीकडे पेट्रोलची किंमत शंभरी गाठण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि दुसरीकडे त्यांचा हसरा चेहरा. लोकांना रडू येत आहे अशी अवस्था झालेली आहे पेट्रोल पंपावर”.

तर महेश मांजरेकर यांना देखील काही प्रश्न विचारले सलमान खान की संजय दत्त ? नटसम्राट चित्रपटामध्ये कोणाचा अभिनय आवडला? नाना पाटेकर की विक्रम गोखले ? बिग बॉस मराठीमधील आवडती स्पर्धक कोण? मेघा धाडे की स्मिता गोंदकर ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2018 05:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...