मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /आशिष विद्यार्थीच्या दुसऱ्या लग्नावर पहिल्या बायकोनं दिली प्रतिक्रिया; 2 ओळीत हलकं केलं मनातलं दु:ख

आशिष विद्यार्थीच्या दुसऱ्या लग्नावर पहिल्या बायकोनं दिली प्रतिक्रिया; 2 ओळीत हलकं केलं मनातलं दु:ख

आशिष विद्यार्थी पहिल्या बायकोची प्रतिक्रिया

आशिष विद्यार्थी पहिल्या बायकोची प्रतिक्रिया

आशिष यांंचं पहिलं लग्न अभिनेत्री राजोशी व‍िद्यार्थीबरोबर केले होतं. राजोशी ही देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आहे.

मुंबई,  26 मे  : बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला.  25 मे रोजी त्यांनी आशिष विद्यार्थी यांनी आसामच्या रुपाली बरूआ बरोबर लग्नगाठ बांधली. आशिष विद्यार्थी यांनी  वयाच्या  60व्या वर्षी लग्न केल्यानं सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्याचप्रमाणे आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नावर पहिली पत्नी राजोशी बरूआ काय प्रतिक्रिया आहे हे देखील जाणून. आशिष विद्यार्थीच्या पहिल्या पत्नीची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.पण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही क्रिप्टिक पोस्टने त्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नावर नाराज असल्याचं समोर आलं आहे. काय म्हटलंय आशिष विद्यार्थीच्या पहिल्या पत्नीनं पाहूयात.

आशिष यांंचं पहिलं लग्न अभिनेत्री राजोशी व‍िद्यार्थीबरोबर केले होतं. राजोशी ही देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आहे.   राजोशी या सध्या लाइम लाइटपासून दूर आहेत.  नवऱ्याचं दुसरं लग्न झाल्यानंतर राजोशी यांनी सोशल मीडियावर काही क्रिप्टिक पोस्ट शेअर केल्या आहेत. यावरून त्या नाराज असल्याचं दिसत आहे. पहिल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की,   योग्य व्यक्ती तुम्हाला तुम्ही त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. ती व्यक्ती तुम्हाला त्रास होणार नाही असं काही करणार नाही. हे लक्षात ठेवा.

हेही वाचा -  आशिष विद्यार्थींनी केलं दुसरं लग्न; अभिनेत्याची पहिली पत्नी देखील आहे लोकप्रिय अभिनेत्री पण...

राजोशी यांनी त्यांच्या मनातील भावना या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्या अशा व्यक्तीबद्दल बोलत आहेत ज्यांनी त्यांना त्रास दिला आहे ज्यांना त्या फार खास समजत होत्या.  इतकंच नाही तर राजोशी यांनी त्यांच्या दुसऱ्या पोस्टमध्ये संघर्षावर भाष्य केलं आहे.

त्यांनी शेअर केलेल्या दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय,  अति विचार करणं आणि मनात शंका येणं आता तुमच्या डोक्यातून निघून जावं.  सगळं कनफ्युजन संपून जावं आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागतील. तुमचं आयुष्य शांती आणि आनंदाने भरून जावं. तुम्ही अनेक वर्ष मजबूत होऊन उभे राहाल. आता तुमच्यासाठी पाठवलेले आशीर्वाद घेण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. त्यावर तुमचा हक्क आहे.

आशिष विद्यार्थी आणि राजोशी यांना एक मुलगा आहे. राजोशी या फार साध जीवन जगतात. राजोशी या अभिनेत्री शकुंतला बरवा यांची मुलगी आहे.आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट देणाऱ्या शकुंतला यांची राजोशी ही एकुलती एक मुलगी आहे. हिंदीसोबतच शकुंतला यांनी बंगाली सिनेसृष्टीतही खूप नाव कमावले आहे

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News