Home /News /entertainment /

पुण्याचा आशीष का करतो शनमुखप्रियाची मदत? इंडियन आयडॉलच्या मंचावर खुलतंय नवं नातं

पुण्याचा आशीष का करतो शनमुखप्रियाची मदत? इंडियन आयडॉलच्या मंचावर खुलतंय नवं नातं

दोघांनी ‘पछताओगे’ आणि ‘उड़ी तेरी आंखों से’ या गाण्यांवर धम्माल परफॉरमंस दिला. मात्र गाणं गाऊन झाल्यानंतर त्यांनी अशी एक माहिती सांगितली की ज्यामुळं सर्वजण अवाक् झाले. सर्वांच्या डोळ्यात अश्रू तराळू लागले.

  मुंबई 26 मे: इंडियन आयडल हा (Indian Idol 12) शो आपल्या चित्रविचित्र प्रयोगांमुळं सध्या सातत्यानं चर्चेत आहे. कधी या संगीत शोमध्ये विशेष पाहुणे बोलावले जातात तर कधी स्पर्धकांच्या पालकांना डेटवर पाठवलं जातं. आता या स्पर्धेत मेन वर्सेस वुमन अशी अनोखी स्पर्धा रंगणार आहे. म्हणजेच पुरुष गायक स्त्री गायकांना आव्हान देताना दिसणार आहे. इंडियन आयडलचा हा विशेष भाग नुकताच पार पडला. यामध्ये आशीष कुलकर्णीनं शनमुखप्रियाला आव्हान दिलं होतं. (Ashish Kulkarni vs Shanmukhapriya) दोघांनी ‘पछताओगे’ आणि ‘उड़ी तेरी आंखों से’ या गाण्यांवर धम्माल परफॉरमंस दिला. मात्र गाणं गाऊन झाल्यानंतर त्यांनी अशी एक माहिती सांगितली की ज्यामुळं सर्वजण अवाक् झाले. सर्वांच्या डोळ्यात अश्रू तराळू लागले. आशीष म्हणाला, “मी आणि शनमुखप्रिया आम्ही प्रतिस्पर्धी नाहीत. आम्ही एकाच कुटुंबातील दोन सदस्य आहोत. जेव्हा मी कोरोनामुळं आजारी होतो तेव्हा शनमुखप्रियानं आजाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. मला ती सतत प्रोत्साहन देते. मी खुपच लकी आहे माझ्या आयुष्यात शनमुखप्रिया आहे. ती माझ्या बहिणीसारखी माझी काळजी घेते.” दोघांमधील हे भाऊ-बहिणीचं नातं पाहून सर्वांनाच आनंद झाला. परिक्षकांसह सर्वांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तराळू लागले. सर्वांनी त्यांच्या नात्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ‘ते क्षण पुन्हा अनुभवायचे आहेत...’; वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुख झाला भावुक
  गेल्या आठवड्यात शनमुखप्रियाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. तिनं श्रवण राठोड या स्पेशल शोमध्ये हमको सिर्फ तुमसे प्यार है हे गाणं गायलं होतं. या गाण्यामध्ये तिनं घेतलेल्या हरकती अनेक प्रेक्षकांना आवडल्या नव्हत्या. परिणामी तिला एलिमिनेट केलं जावं. ती उगाचच शिरा ताणून गात असते अशी टिका तिच्यावर केली जात होती. या ट्रोलिंगला थांबवण्यासाठी व शनमुखप्रियाचा भाव पुन्हा वधारावा यासाठी शोवाल्यांनी एक नवा स्टंट केला आहे अशीही टीका काही प्रेक्षक करत आहेत. अर्थात यावर निर्मात्यांनी अद्याप कुठलही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Entertainment, Indian idol

  पुढील बातम्या