मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Tanushree Dutta: पहिल्याच सिनेमात इमरान हाश्मीसोबत दिले असे सीन्स; नानांवर केले गंभीर आरोप; वादग्रस्त राहिलं अभिनेत्रीचं आयुष्य

Tanushree Dutta: पहिल्याच सिनेमात इमरान हाश्मीसोबत दिले असे सीन्स; नानांवर केले गंभीर आरोप; वादग्रस्त राहिलं अभिनेत्रीचं आयुष्य

तनुश्री दत्ता

तनुश्री दत्ता

तनुश्रीच्या आयुष्याची कथा खूपच रंजक अशीच आहे. करिअरच्या शिखरावर पोहचल्यानंतर अभिनेत्रीच्या नशिबाने असे वळण घेतले की एका क्षणात सगळंच संपलं. आता ही अभिनेत्री नेमकं काय करते, कसा होता तिचा प्रवास जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 मार्च:  काही बॉलिवूड अभिनेत्री आपल्या अभिनयापेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यामुळेच ओळखल्या जातात. त्यांचं खाजगी आयुष्य कायमच चर्चेत राहतं. या अभिनेत्रींनपैकीच एक म्हणजे अभिनेत्री तनुश्री दत्ता.  तनुश्रीच्या आयुष्याची कथा खूपच रंजक अशीच आहे. 19 मार्च 1984 रोजी जमशेदपूर, झारखंड येथे जन्मलेल्या तनुश्रीच्या नशिबी आधी 'श्री' म्हणजेच 'मनी' म्हणजेच 'पैसा' असे लिहिले होते, त्यानंतर करिअरच्या शिखरावर पोहचल्यानंतर  अभिनेत्रीच्या नशिबाने असे वळण घेतले की एका क्षणात सगळंच संपलं. आता ही अभिनेत्री नेमकं काय करते, कसा होता तिचा प्रवास जाणून घ्या.

बंगाली मुली आणि बॉलीवूडचा संबंध खूप जुना आहे. सिनेविश्वात अशा अनेक बंगाली मुली आहेत, ज्या आपल्या स्टाईलने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करतात. तनुश्री दत्ता त्यापैकीच एक. 1984 साली बंगाली कुटुंबात जन्मलेल्या तनुश्रीने बॉलिवूडमध्ये एंट्री घेऊन आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांना  आपल्या सौंदर्याचा 'आशिक' बनवले. मात्र, शिक्षण घेत असतानाच ती मॉडेलिंगमध्ये इतकी मग्न झाली की तनुश्रीला अभ्यास मागे सोडून रॅम्पवर चालणे अधिक आवडू लागले.

Gayatri Joshi: पहिल्याच सिनेमात किंग खान सोबत केला रोमान्स; स्वदेस फेम अभिनेत्रीनं का सोडलं बॉलिवूड?

मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवताच तनुश्रीला अशी पदवी मिळाली, ज्याने तिच्यासाठी बॉलिवूडचे  दरवाजे उघडले. 2004 मध्ये तनुश्री दत्ताने मिस इंडिया युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता, त्यानंतर तिला त्याच वर्षी मिस युनिव्हर्समध्ये भारताचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर लगेचच तनुश्रीची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली. इमरान हाश्मीसोबत 'आशिक बनाया आपने' या रोमँटिक चित्रपटातून तनुश्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'आशिक बनाया आपने' या चित्रपटात तनुश्रीने दिलेल्या बोल्ड सीन्सची सगळीकडेच चर्चा झाली.

यानंतर तनुश्रीला अनेक चित्रपट मिळाले. 'भागम भाग', 'ढोल', '36 चायना टाउन', 'स्पीड', 'गुड बॉय बॅड बॉय', 'चॉकलेट' आणि 'राकीब' यासह अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले. मात्र, पहिल्याच चित्रपटात यशाची चव चाखणाऱ्या तनुश्रीला पुन्हा तेच यश मिळाले नाही. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरली.  त्यानंतर 2010 मध्ये तनुश्रीने बॉलिवूडला कायमचा रामराम केला.

चुटकीसरशी सर्व काही मिळविलेल्या तनुश्रीला तिची ढासळतीं कारकिर्द  सांभाळता आली नाही आणि ती हळूहळू नैराश्याची शिकार झाली. यातून सुटका करून घेण्यासाठी तिने ग्लॅमर दुनियेला अलविदा करत अध्यात्माची निवड केली आणि ती एका आश्रमात राहायला गेली. मात्र, तनुश्रीने अचानक बॉलीवूडला कसा अलविदा केला याबाबत सर्वांच्या मनात एक गूढ कायम होते. इंडस्ट्रीतील दिग्गज नाना पाटेकर यांच्या विरोधात मी टू मोहीम सुरू करून तनुश्रीने सर्वांच्या मनात सुरू असलेल्या या गोंधळांला उत्तर दिले. त्यानंतर तनुश्री कायम चर्चेत राहते.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment