मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Viththala Tuch: आषाढी एकादशीनिमित्त 'विठ्ठला तूच' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित!

Viththala Tuch: आषाढी एकादशीनिमित्त 'विठ्ठला तूच' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित!

(Ashadhi Wari) आषाढी वारीच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार विठ्ठल भक्तीत मग्न झाले आहेत. याच धर्तीवर एका सिनेमाची घोषणा झाली असून त्याचा नवा अपडेट समोर आला आहे.

(Ashadhi Wari) आषाढी वारीच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार विठ्ठल भक्तीत मग्न झाले आहेत. याच धर्तीवर एका सिनेमाची घोषणा झाली असून त्याचा नवा अपडेट समोर आला आहे.

(Ashadhi Wari) आषाढी वारीच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार विठ्ठल भक्तीत मग्न झाले आहेत. याच धर्तीवर एका सिनेमाची घोषणा झाली असून त्याचा नवा अपडेट समोर आला आहे.

मुंबई 6 जुलै: सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या अनेक कलाकार हे विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या विठूरायासाठी वारी करणाऱ्या भक्तांच्या आणि अगदी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणाऱ्या विठ्ठलाचा महिमा अपरंपार आहे असं विठ्ठलाला मानणाऱ्या अनेकांचं म्हणणं आहे. विठ्ठलाप्रमाणेच प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या विठ्ठल शिंदेचा खडतर प्रवास 'विठ्ठला तूच' (Viththala Tuch marathi movie) या नव्याकोऱ्या रोमँटिक कथेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विठ्ठला तूच असं जेव्हा विठुरायाला म्हणल जातं तसंच या चित्रपटातील नायकालाही या चित्रपटाच्या कथेने विठ्ठला तूच असं म्हणायला भाग पाडलं आहे.

या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं असून पोस्टर पाहताना त्यावरील व्यक्ती नेमकी कोण आहे हा प्रश्न नक्कीच पडला असेल, तर पोस्टरवरील व्यक्ती ही नवोदित अभिनेता योगेश जम्मा असून त्याचा 'विठ्ठला तूच' हा पहिलाच चित्रपट आहे.

हे ही वाचा- 48 वर्षीय अभिनेत्रीकडे 23 वर्षीय निर्मात्याने केली शरीरसुखाची मागणी, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

दिग्दर्शक प्रफुल्ल म्हस्के दिग्दर्शित 'विठ्ठला तूच' या चित्रपटाची कथा रोमँटिक असून चित्रपटात विठ्ठला म्हणजेच योगेशचा एकंदरीत प्रवास, आणि त्या दरम्यान जुळून आलेलं त्याच प्रेम आणि त्यानंतर जुळलेल्या प्रेमाचा प्रवास पाहायला मिळणार आहे. तसंच नुकतंच प्रदर्शित झालेलं चित्रपटाचं पोस्टर पाहता पोस्टरवर योगेशचा रावडी लूक पाहायला मिळत आहे. गावातल्या वातावरणात चित्रित झालेला हा चित्रपट गावरान प्रेमाचा तडका दाखवून प्रेक्षकांना भुरळ पाडेल यात शंकाच नाही, अशी प्रतिक्रिया समोर येत आहे.

त्यात योगेशचा रावडी लूक आणि त्याने मांडलेली प्रेमाची परिभाषा पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. या चित्रपटात योगेशसह आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा हर्षित अभिराज यांनी सांभाळली आहे. यातील दमदार गाणी प्रेक्षकांना पाहणं रंजक ठरेल यात शंका नाही.

रोमँटिक चित्रपटाची चलती थोडीशी कमी झालेली असताना पुन्हा एकदा 'विठ्ठला तूच' हा चित्रपट प्रेममय भावना मोठ्या पडद्यावर व्यक्त करण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास लवकरच सज्ज होत आहे. तसेच चित्रपटात आणखी कोणते कलाकार प्रेमाचे रंग दाखवणार हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.

First published:

Tags: Marathi cinema, Pandharpur, Upcoming movie, Wari