04 आॅक्टोबर : दिल्लीत आशा भोसलेंनी आपल्या मेणाच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. दिल्लीच्या मॅडम तुसाॅमध्ये हा पुतळा पाहता येतोय. हा मेणाचा पुतळा बघताना आशाताई एकदम भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, 'मला आरशात पाहिल्यासारखं वाटतंय.'
हा मेणाचा पुतळा आशाताईंसारखाच एव्हरग्रीन आहे. गळ्यात मोत्याची माळ, केसात गजरा, हातात माईक अशा रुपात उभा केलाय.
पुतळा पाहताना त्या म्हणाल्या, 'मला आज अमर झाल्यासारखं वाटतंय. ज्यांनी हा पुतळा बनवला त्यांचा अभिमान वाटतोय. माझी निवड हा माझा गौरव नसून, भारताचा आहे.'
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा