आशा भोसले-साधना सरगम यांची सुरेल जुगलबंदी

आशा भोसले-साधना सरगम यांची सुरेल जुगलबंदी

आपल्या मोहक सुरांच्या जादूने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि साधना सरगम यांनी ‘हिरो’ या आगामी मराठी चित्रपटासाठी एक जुगलबंदी गायलीय

  • Share this:

21 एप्रिल : आपल्या मोहक सुरांच्या जादूने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि साधना सरगम यांनी ‘हिरो’ या आगामी मराठी चित्रपटासाठी एक जुगलबंदी गायलीय आणि या जुगलबंदीवर अभिनेत्री दीपाली सय्यद आणि शास्त्रीय नृत्यात तरबेज अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांचा भन्नाट नृत्याविष्कार पहायला मिळणार आहे. एन.एन सिद्दिकी दिग्दर्शित ‘हिरो’ चित्रपटातील हे गीत नुकतंच चित्रीत करण्यात आलं आहे.

‘धिनक धिन आग लगा दू मे’.. ‘गं बाई माझा तोरा नखरेल’ असे बोल असलेल्या या गीताला ख्यातनाम ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि साधना सरगम यांनी मखमली स्वरसाज दिला आहे. गीतकार असलम सयानी आणि कौस्तुभ पंत यांनी लिहिलेल्या या हिंदी-मराठी फ्युजन गीताला संगीताची साथ संगीतकार राजा अली यांनी दिली आहे तर नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केलं आहे.

'सवाल जवाबाची ही जुगलबंदी गाणं माझ्यासाठी स्पेशल अाहे.  ठेका धरायला लावणारी जुगलबंदी प्रेक्षकांनाही आवडेल, ' असा विश्वास साधना सरगम यांनी व्यक्त केला.

‘हिरो’ चित्रपटात रमेश देव, विजय पाटकर, उदय टिकेकर, सुखदा खांडकेकर, भूषण पाटील, वैष्णवी कर्मारकर यांच्या भूमिका आहेत.

First published: April 21, 2017, 12:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading