Birthday Special : 'त्या' निर्णयामुळे आशा भोसले लता दीदींपासून होत्या दुरावल्या

Birthday Special : 'त्या' निर्णयामुळे आशा भोसले लता दीदींपासून होत्या दुरावल्या

लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन्ही बहीणींनी मिळून अक्षरशः बॉलिवूड गाजवलं. त्यांचं आयुष्य एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही.

  • Share this:

मुंबई, 08 सप्टेंबर : बॉलिवूडची मेलॉडी क्वीन आशा भोसले यांचा आज 86 वा वाढदिवस. ‘गोल्डन आशा’ नावानं प्रसिद्ध असलेल्या आशा भोसले यांनी आतापर्यंत 16 हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. आशाताईंच्या प्रोफेशनल लाइफमध्ये एवढे चढउतार आले नाही जेवढं पर्सनल लाइफमध्ये त्यांना अनेक गोष्टींना समोरं जावं लागलं. त्यांच्या वैयक्तीक आयुष्यात सर्वात मोठी भूमिका रहिली ती त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर यांची. या दोन्ही बहीणींनी मिळून अक्षरशः बॉलिवूड गाजवलं. त्यांचं आयुष्य एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही. एकमेकींपासून दूर होऊनही त्यांच्यातील प्रेम कमी झालं नाही. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊयात आशाताईंच्या खासगी आयुष्याचे काही पैलू...

आशाताईंची मोठी बहीण म्हणजेच भारताच्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या 14 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली होती. वडीलांच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी लता दीदींवर येऊन पडली आणि घरातली मोठी मुलगी म्हणून लता दीदींनी ती जबाबदारी व्यवस्थित पारही पाडली. ज्यावेळी आशाताई मोठ्या झाल्या त्यावेळी लता दीदींना त्यांच्याकडून याचं जबाबदार वागण्याची आणि गंभीरतेची अपेक्षा होती.

प्रियांका चोप्रा म्हणते, मला आई व्हायचंय, पण...

नियमांत बांधून राहणं आशाताईंच्या स्वभावात नव्हतं

लता दीदींनी आशाताईंकडून जबाबदार वागणूकीची अपेक्षा केली खरी मात्र आशाताई लहानपणापासूनच फार वेगळ्या स्वभावाच्या होत्या. त्यांना स्वतःला नियमांमध्ये बांधून ठेवणं आवडत नसे. त्यामुळे त्यांनी आपला वेगळा रस्ता निवडला. वयाच्या 16 व्या वर्षीच आशाताईंनी गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी गणपतराव 31 वर्षांचे होते. फार कमी लोकांना माहित आहे की गणपतराव त्यावेळी लता दीदींचे सेक्रेटरी होते.

या कारणामुळे दूर झाल्या लता दीदी आणि आशाताई

एका मुलाखतीत आशाताईंनी सांगितलं, लतादीदींना अशाताई आणि गणपतरावांचं नातं मान्य नव्हतं. त्यामुळे या दोन्ही बहीणींमध्ये दुरावा आला. यामुळे बरेच दिवस या दोघीही एकमेकींशी बोलत नव्हत्या. आशाताईंनीही त्यावेळी माहेरच्यांशी सर्व संबंध तोडले. संपूर्ण कुटुंबापासून वेगळं होऊन आशाताईंनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली.

लग्नाच्या 8 वर्षानंतर इम्रान खान घेणार घटस्फोट? पत्नीनं शेअर केली इमोशनल पोस्ट

खरा ठरला लता दीदींचा संशय

लता दीदींनी एका मुलाखतीत आशाताईंच्या नात्याला विरोध करण्याचं कारण स्पष्ट केलं होतं. हे नातं आपल्या बहीणीसाठी योग्य नाही असं लता दीदींना मनापासून वाटत होतं आणि शेवटी असंच झालं. आशाताई आणि गणपतरावांना 3 मुलं झाली. मात्र त्यांच्यामध्ये मतभेदांना सुरुवात झाली आणि अखेर हे नातं एक वाईट वळणावर येऊन संपलं. दोघंही वेगळे झाले. पण एवढं झाल्यावरही लतादीदी आणि आशाताईंमधील दुरावा संपला नव्हता.

आर. डी. बर्मन यांच्याशी केलं लग्न

गणपतरावांशी घटस्फोट केल्यानंतर आशाताईंनी आर. डी. बर्मन यांच्याशी लग्न केलं. आर. डी. बर्मन विवाहीत होते आणि त्यांच्या पहिली पत्नी रिता पटेल हीच्याशी घटस्फोट झाला होता. संगीतावरील प्रेमानं आशाताई आणि आर. डी. बर्मन यांना एकत्र आणलं आणि सहा वर्षांनी लहान असलेल्या आर. डी. बर्मन यांनी आशाताईंना प्रपोज केलं. त्यानंतर बऱ्याच काळानंतर आशाताई या नात्यासाठी तयार झाल्या. 1980 मध्ये या दोघांनी लग्न केलं.

नेहमीच खंबीर राहील्या आशाताई

आर. डी. बर्मन यांच्याशी लग्न केल्यानंतर काही वर्षांतच या दोघांच्याही नात्यात दुरावा यायला सुरुवात झाली. मात्र हे दोघंही मनानं एकमेकांसोबत राहिले. पण बर्मन सुद्धा अकाली जग सोडून गेले आणि आशाताई पुन्हा एकट्या पडल्या. आयुष्यात एवढे चढ-उतार पाहूनही आशाताई नेहमीच खंबीर राहिल्या आणि आयुष्यात नवं यश मिळवत गेल्या. आजही संगीत क्षेत्रात त्या सक्रिय आहेत. याशिवाय आशाताईनी अभिनय आणि कुकींग क्षेत्रातही आपलं नशीब आजमावून पाहिलं आहे.

अखेर सलमान खाननं केली 'दिल की बात', कतरिनाला म्हणाला...

=================================================================

असे असतील मुंबईतील 3 नवीन मेट्रो मार्ग, पाहा SPECIAL REPORT

Published by: Megha Jethe
First published: September 8, 2019, 9:56 AM IST

ताज्या बातम्या