आशा भोसलेंनी पाकिस्तानला असं केलं ट्रोल, नेटकरी झाले खूश

आशा भोसलेंनी पाकिस्तानला असं केलं ट्रोल, नेटकरी झाले खूश

आशा भोसले यांनी त्याच्या ट्विटरवर नुकतीच एक पोस्ट टाकली आहे ज्यात कोणताही उल्लेखही न करता त्यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.

  • Share this:

मुंबई, 16 ऑगस्ट : भारत आणि पाकिस्तान मध्ये मागच्या बऱ्याच काळापासून 'ट्वीटर वॉर' सुरू आहे. यात सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीत. काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर  पाकिस्तान आणि भारतीतील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून ट्वीट करत एकमेकांवर निशाणा साधला. एवढंच नव्हे तर पाकिस्तानं भारतीय सिनेमांवरही बंदी घातली. त्यावरून मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या पण आता या 'ट्वीटर वॉर'मध्ये प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही उडी घेतली आहे. आशा भोसले यांनी त्याच्या ट्विटरवर नुकतीच एक पोस्ट टाकली आहे ज्यात कोणताही उल्लेखही न करता त्यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.

आशा भोसले यांनी पाकिस्तानच्या नावाचा उल्लेख न करता उपरोधिक टीका केली आहे. त्यांनी लिहिलं, सोनं विसरा, भारतीय सिनेमांच्या सीडींमध्ये गुंतवणूक करा. काही दिवसांनी त्यांनी खूप मागणी असणार आहे. आशाजींचं हे ट्वीट पाकिस्तानसाठी उपरोधिक टोला होता. कारण काही दिवसांपूर्वी पाकिस्तानं भारतीय सिनेमा पाकिस्तानात रिलीज करण्याला बंदी आणली आहे. याशिवाय नुकतंच त्यांनी भारतीय जाहिरातींवरही बंदी घातली आहे. त्यामुळे आशाजीनी पाकिस्तानच्या नावाचा उल्लेख न करता केलेलं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून सोशल मीडियावर आशाजींचं कौतुक केलं जात आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम रद्द केल्यानंतर आणि त्याला दोन भागात विभागून केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा दिल्यामुळे पाकिस्तानने संताप सुरू केला आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला दहशतवादी कारवाया करता येणार नाही याची जाणीव झाली आहे. त्यामुळेच काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले आणि हिंसाचार पसरवण्यासाठी पाक घुसखोरीचे प्रयत्न करत आहे. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याची संधी मिळावी यासाठी पाकिस्तानकडून गोळीबार केला जात आहे. मंगळवारी रात्री देखील दहशतवाद्यांच्या एका गटाला घुसखोरी करण्यासाठी पाकने मदत केली होती. तेव्हा भारतीय जवानांनी त्यांचा डाव उधळला होता.

Laal Kaptaan Teaser : सेक्रेड गेम्सनंतर सैफ नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला

जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने (Pakistan) भारताविरुद्धच्या कुरापती वाढवल्या आहेत. 370 हटवण्याला विरोध केल्यानंतर आता पाकिस्ताने काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवण्यासाठी सीमेवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. पाककडून सातत्याने सीमेवर गोळीबार सुरू आहे. या गोळीबाराला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे.

घटस्फोटानंतर अमृतानं मागितले ‘इतके’ कोटी, सैफनं हप्त्यांमध्ये चुकवली रक्कम

भारताने दिलेल्या उत्तरामुळे पाकिस्तानचे अनेक जवान ठार झाले आहेत. तर भारताविरुद्ध सुरू असलेल्या खोट्या प्रचाराचा भाग म्हणून पाकिस्तानने भारताने त्यांचे 3 जवान ठार मारल्याचा आरोप केला आहे. तसेच आम्ही (पाक) देखील भारताचे 5 जवान ठार केल्याचा दावा केला आहे. भारतीय लष्कराने (Indian Army) मात्र पाकचा हा दावा फेटाळून लावला आहे.

उघडपणे Porn पाहतात ‘हे’ लोक, अभिनेत्री रिचा चढ्ढाचा खळबळजनक दावा

=======================================================================

इराणमध्ये सुपरहिट तामिळ गाण्यावर होतोय चक्क व्यायाम, SPECIAL REPORT

Published by: Megha Jethe
First published: August 16, 2019, 5:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading