Asha Bhosle Birthday Special : आशा भोसलेंच्या या पाच सदाबहार गाण्यानी केलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

Asha Bhosle Birthday Special : आशा भोसलेंच्या या पाच सदाबहार गाण्यानी केलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

बॉलिवूडमध्ये सदाबहार गाणी गायलेल्या आशा भोसलेंचा आज वाढदिवस आहे. वयाच्या 87व्या वर्षात त्यांनी आज पदार्पण केले आहे. त्यांच्या चिरतरुण आवाजाने त्यांनी बॉलिवूडमधील एक मोठा काळ गाजवलेला आहे.

  • Share this:

मुंबई, 08 संप्टेंबर : 'चुरा लिया है तुमने जो दिल को…’ हे गाणे केव्हाही ऐकले तरी आशा भोसले (Asha Bhosale) यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बॉलिवूडमध्ये सदाबहार गाणी गायलेल्या आशा भोसलेंचा आज वाढदिवस आहे. आज त्यांनी वयाच्या 87व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांच्या चिरतरुण आवाजाने बॉलिवूडमधील एक मोठा काळ गाजवलेला आहे. सर्वात जास्त गाणी रेकॉर्ड करण्याचा देखील त्यांच्याच नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.

त्याचबरोबर बॉलिवूडमधील अनेक प्रतिष्ठित व मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. भारत सरकारच्या देखील पद्म विभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन देखील त्यांचा गौरव करण्यात आला आहे. वयाची 87 वर्षे गाठलेल्या आशा भोसले यांच्या 5 गाजलेल्या, निवडक आणि आयकॉनिक गाण्यांवर नजर टाकणार आहोत.

1. तू तू वही है

आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्द केलेले हे गाणे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. 1983 सालच्या 'ये वादा रहा' या सिनेमामध्ये आशा भोसले यांनी हे गाणे गायले होते. ऋषी कपूर, पूनम ढिल्लन  आणि टीना मुनीम यांनी या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील हे गाणे विशेष प्रसिद्ध आहे.

2. जरा स झूम लू मै

काजोल आणि शाहरुख खानवर चित्रित झालेले हे गाणे देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. आनंद बक्षी यांचे स्वर आणि जतिन ललित यांच्या संगीतामुळे हे गाणे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमासाठी आशा भोसले यांनी हे गाणे गायले होते. आजदेखील हे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जाते.

3. दम मारो दम

'हरे रामा हरे कृष्णा' सिनेमातील हे गाणे आजदेखील तितक्याच मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून या सिनेमासाठी आशा भोसले यांनी फिल्मफेअरचा उत्कृष्ट प्लेबॅक सिंगरचा पुरस्कार देखील मिळाला होता. या गाण्याच्या रिमेक्सना आशाजींंच्या मूळ गाण्याची सर आली नाही.

4. चुरा लिया है तुमने जो दिल को

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातील हे गाणे अजूनही क्रित्येक वर्ष लोकांच्या ओठांवर तसेच राहणार आहे. आज देखील इतक्या वर्षांनी सर्वांचेच लाडके हे गाणे असून मजरुह सुलतानपुरी आणि पंचमदा यांचे हे गाणे अजरामर असे आहे म्हणावे लागेल. आशा भोसले यांच्याबरोबर मोहम्मद रफी आणि आर डी बर्मन यांच्या आवाजामुळे या गाण्याला चार चांद लागले आहेत.

5. कहीं आग लगे

'ताल' सिनेमातील हे गाणे अनिल कपूर, ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना, अमरीश पुरी, अलोक नाथ आणि सौरभ तिवारी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. ताल सिनेमाचे हे टायटल सॉंग आजदेखील तितक्याच प्रमाणात लोकप्रिय आहे. आशा भोसले यांच्याबरोबरच आदित्य नारायण, रिचा शर्मा यांनी देखील या गाण्यातील काही भाग गायला आहे.

आशाजीनी 20हून आधिक भाषांमध्ये गाणी गायली असून त्यांनी विविध प्रकारच्या संगीतशैलीतील गाणी म्हटली आहेत. बॉलिवूड गाण्यांबरोबरच त्यांनी गझल, भजन, शास्त्रीय संगीत, पारंपरिक संगीत, कव्वाली आणि रवींद्र संगीत देखील गायले आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 8, 2020, 4:34 PM IST

ताज्या बातम्या