मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

NCB कार्यालयात येण्यापूर्वी 'सायकोलॉजिकल थ्रिलर' वाचत होता आर्यन खान;असं होतं पुस्तकाचं नाव

NCB कार्यालयात येण्यापूर्वी 'सायकोलॉजिकल थ्रिलर' वाचत होता आर्यन खान;असं होतं पुस्तकाचं नाव

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) गेली अनेक दिवस 'ड्रग्स प्रकरणा'मुळे चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात आर्यनला जामीन मिळाल्याने सध्या तो आपल्या कुटुंबासोबत राहात आहे. आज त्याने NCB कार्यालयात हजेरी लावली होती.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 5 नोव्हेंबर- बॉलिवूड  (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा  (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान  (Aryan Khan) गेली अनेक दिवस 'ड्रग्स प्रकरणा'मुळे चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात आर्यनला जामीन मिळाल्याने सध्या तो आपल्या कुटुंबासोबत राहात आहे. आज त्याने NCB कार्यालयात हजेरी लावली होती. दरम्यान त्याच्या हातात एक पुस्तक सर्वांना दिसून आलं. या पुस्तकाला काळजीपूर्वक पहिल्यांनंतर लक्षात आलं की हे एक इंग्लिश पुस्तक  (Book) आहे ज्याचं नाव 'द गर्ल विद द ड्रॅगन टॅटू'  (The Girl With The Dragon Tattoo)  असं आहे. ही एक सस्पेन्स थ्रिलर कथा आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 'ड्रग्स प्रकरणात' चांगलाच चर्चेत आला आहे. दिवसेंदिवस होत असलेल्या गंभीर आरोपांनी त्याची जामीन पुढे ढकलण्यात येत होती. मात्र गेल्या आठवड्यात तब्बल २६ दिवसांनंतर आर्यन खानला जामीन मिळाला होता. आता तो आपल्या कुटुंबासोबत राहात आहे. आज NCB कार्यलयात त्याची हजेरी होती. त्यासाठी आर्यन खान वडील शाहरुख खानच्या अंगरक्षकासोबत पोहोचला होता. यावेळी आर्यन खानच्या हातात एक पुस्तक असल्याचं आढळून आलं आहे. एका स्वीडिश लेखकानं हे पुस्तक लिहिलं आहे. स्टील लारसन असं त्या लेखकाचं नाव आहे. या पुस्तकावरून एक प्रसिद्ध चित्रपटसुद्धा तयार झाला आहे. या चित्रपटाने ऑस्करसुद्धा पटकावला आहे. यामध्ये जेम्स बॉन्ड फेम अभिनेता डॅनिअल क्रॅग आणि रुनी मारा यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

आर्यन खानच्या मुलाला अनेक अटी शर्तींवर हा जामीन देण्यात आला आहे. या अटींमध्ये देशाबाहेर,मुंबईबाहेर न जाणे, पासपोर्ट सरेंडर,अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. ३ ऑक्टोबर रोजी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका हायप्रोफाईल क्रूझवरील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती. या ड्रग्स प्रकरणामुळे आर्यनसह इतर ७ जणांना कस्टडीत ठेवण्यात आलं आहे. सध्या आर्यन खानच्या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरु आहे. मात्र त्याला जामीन अजूनही मिळाला नाही. काळ झालेल्या सुनावणीमध्ये त्याचा जमीन अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. त्यांनतर आर्यन खानचा वकिलाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.

First published:

Tags: Aryan khan, Drugs, Entertainment, NCB, Shahrukh khan