Home /News /entertainment /

कैदी नं 956! आर्यनला जेलमध्ये मिळाली नवी ओळख; तर शाहरूखने पाठवला इतक्या रुपयांचा मनी ऑर्डर

कैदी नं 956! आर्यनला जेलमध्ये मिळाली नवी ओळख; तर शाहरूखने पाठवला इतक्या रुपयांचा मनी ऑर्डर

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात जेलमध्ये राहावं लागत आहे. त्याच्याविरुद्ध NCBने काही पुरावे सादर करत त्याला जामीन न देण्याची अपील केली आहे.

    मुंबई,15 ऑक्टोबर- बॉलिवूडचा(Bollywood) किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे.मुलगा आर्यन खानच्या ड्रग्स(Aryan Khan Drugs Case) प्रकरणाने त्याच्या कुटुंबाला चांगलंच चिंतेत पाडलं आहे.कालही आर्यन खानला जमीन मिळाला नाही. येत्या २० ऑक्टोबरला या प्रकरणाची सुनावणी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आर्यनला आर्थर रोड, जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. आणि इतर कैद्यांप्रमाणे त्यालाही कैदी नंबर देण्यात आला आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात जेलमध्ये राहावं लागत आहे. त्याच्याविरुद्ध NCBने काही पुरावे सादर करत त्याला जामीन न देण्याची अपील केली आहे. त्यामुळे या केसची सुनावणी २० तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तत्पूर्वी आर्यन खान जेलमध्ये आहे. त्याला आर्थर रोड जेमध्ये बंदिस्त ठेवण्यात आलं आहे. कोरोना अहवाल न आल्यामुळे इतके दिवस आर्यन खान एका वेगळ्या कक्षात बंद होता. मात्र कालच त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्याची पाठवणी जनरल कक्षात करण्यात आली आहे. आता तो इतर कैद्यांसोबत बंद आहे. इतकंच नव्हे तर आर्यन खानला कैदी नंबरसुद्धा देण्यात आला आहे. जेलमध्ये नाव नव्हे तर या नंबरनेच कैद्यांना बोलावलं जातं. हा नंबरच त्यांची ओळख असतो. (हे वाचा:Aryan Khan : आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; कोर्टाकडून आजही जामीन नाहीच) अभिनेता शाहरुख खानचा २३ वर्षीय मुलगा आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये N-९५६ हा नंबर देण्यात आला आहे. हा त्याचा कैदी नंबर आहे. आता जेलमध्ये आर्यन खान नव्हे तर कैदी नंबर ९५६ अशी त्याची ओळख बनली आहे. तसेच कैद्यांना आपल्यासाठी जेलच्या कँटीनमधून काही सामान खरेदी करता यावं. यासाठी कुटुंबियांकडून एक ठराविक रकमेचा कुपन देण्याची परवानगी असते. ४,५०० रुपये अशी या कुपनची रक्कम आहे. याप्रमाणे आर्यन खानलासुद्धा जेलमध्ये ४,५०० रुपयांचं कुपन कुटुंबियांकडून जेलमध्ये पाठवण्यात आलं होतं. इतकंच नव्हे तर आर्यन खानने त्या कुपनचा वापर करत जेलच्या कँटीनमधून आपल्यासाठी बिस्कीट आणि पाण्याची बॉटल खरेदी केली होती. दरम्यान अशी चर्चा सुरु होती, की आर्यनने जेलमधील टॉयलेटचा वापर करायला लागू नये यासाठी फक्त बिस्कीट खाऊन राहायचा प्रयत्न केला आहे. (हे वाचा:Aryan Khan case: आर्यन खान ड्रग्जचा नियमित ग्राहक असल्याचा दावा,'जामीन मिळाला तर) नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयात आपले उत्तर दाखल दिलं होत. त्यानुसार न्यायालायाने २० ऑक्टोबरवर सुनावणी ढकलली आहे. हे प्रकरण बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा २३ वर्षीय मुलगा आर्यन खान आणि इतर सात जणांशी संबंधित आहे. ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत एका हायप्रोफाई क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीत NCBने छापा टाकत या सर्वांना ताब्यात घेतलं होतं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दावा केला होता. की क्रूझ शिपमधील काही व्यक्तींकडून प्रतिबंधित औषधे जप्त करण्यात आली आहेत, ज्याने "आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंग" नेटवर्कचा इशारा दिला आहे ज्याची चौकशी करणे आवश्यक आहे. एनडीपीएस न्यायालयाने सोमवारी एनसीबीला आदेश जारी केले होते आणि त्यानुसार 13 ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणाबाबत उत्तर दाखल करण्यास सांगितले होते.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Shahrukh khan

    पुढील बातम्या