• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Aryan Khan प्रकरणात चर्चेत आलेली शाहरुख खानची मॅनेजर आहे तरी कोण? 45 कोटींची आहे मालकीण

Aryan Khan प्रकरणात चर्चेत आलेली शाहरुख खानची मॅनेजर आहे तरी कोण? 45 कोटींची आहे मालकीण

आर्यनच्या जामीन सुनावणीदरम्यान देखील ही व्यक्ती कोर्टात उपस्थित होती. कोर्टाने जामीन फेटाळला तेव्हा ती व्यक्ती भावूकही झाली होती. आता सर्वांना प्रश्न पडला आहे की ती व्यक्ती कोण आहे?

 • Share this:
  मुंबई, 09 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून NCB नं Cordelia क्रूझवर केलेल्या कारवाईची जोरदार चर्चा सुरु आहे. या कारवाईत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah rukh khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यालाही अटक करण्यात आली आहे. आर्यन खानसह अन्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. या सगळ्या प्रकरणात आर्यनचे आई वडील गौरी आणि शाहरुख खान कुठेही समोर आलेले दिसत नाहीत. मात्र एक नाव आहे जे सतत या प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे 8 ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन सुनावणीदरम्यान देखील ही व्यक्ती (Pooja Dadlani) कोर्टात उपस्थित होती. कोर्टाने जामीन फेटाळला तेव्हा ती व्यक्ती भावूकही झाली होती. आता सर्वांना प्रश्न पडला आहे की ती व्यक्ती कोण आहे? यासोबतच तिचे शाहरूख खानच्या कुटुंबासोबत कनेक्शन काय आहे. कोण आहे पूजा ददलानी? ही व्यक्ती म्हणजे शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आहे. पूजा 2012 पासून शाहरुखची मॅनेजर आहे. पूडा शाहरूखच्या मुंबईतील मन्नत निवासस्थानी आयोजित केलेल्या सर्व पार्टी तसेच फॅमेली फंक्शनमध्ये दिसते. तसेच जेव्हा दिलीप कुमार यांचे निधन झाले तेव्हा शाहरूख सायरा बानो यांची भेट घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी देखील पूजा शाहरूखसोबत होती. यावरून ती शाहरूखच्या कटुंबाच्या किती जवळची आहे हेच लक्षात येते. वाचा :Aryan Khanच्या अटकेनंतर शाहरुख खानचं कोट्यवधींचं नुकसान, या कंपनीने थांबवल्या सर्व जाहिराती पूजाची एकूण संपत्ती किती आहे ? पूजा शाहरूखच्या चित्रपटासंबंधीत फक्त काम पाहत नाही तर ती त्याचे ब्रँड एंडोर्समेंट, शाहरूखची क्रिकेट टीम कोलकाता नाईट रायडर्सचे देखील काम पाहते. मिळालेल्या माहितीनुसार पूजा ददलानीची एकूण संपत्ती 6 दशलक्ष म्हणजेच 45 करोड इतकी आहे.
  पूजाच्या शाहरूख खानच्या कुटुंबासोबत काय आहे कनेक्शन पूजाच्या शाहरूख खानच्या कुटुंबासोबच प्रोफेशनल कनेक्शन नाही तर अनेकवेळा शाहरूखच्या घरच्या कार्यक्रमात दिसते. तसेच त्याच्या मुलासोबतचे फोटो देखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते. वाचा : आर्यन खाननं ड्रग्स घेतले होते का? , NCB च्या पंचनामामध्ये झाला खुलासा आर्थर रोड जेलमध्ये आर्यन आर्यन खानसह अन्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यनसह या प्रकरणात अटक केलेल्या 5 आरोपींना देखील तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तर मुनमुन धमेचा सहित दोन महिला आरोपींची रवानगी भायखळा जेलमध्ये करण्यात आली आहे. एनसीबीच्या माहितीनुसार, आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांसमोर कबूल केले आहे की तो चरसचं सेवन करतो. त्याचा मित्र अरबाज मर्चंट त्याच्या शूजमध्ये 6 ग्रॅम चरस लपवून लक्झरी क्रूझवर गेला होता. जेणेकरून त्यांना क्रूझवर धमाकेदार पार्टी करता येईल. .
  Published by:News18 Trending Desk
  First published: