मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आर्यन खान प्रकरणात न्यायालयाकडून 'NCB'ला दिलासा, आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ

आर्यन खान प्रकरणात न्यायालयाकडून 'NCB'ला दिलासा, आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ

Aryan Khan Drugs Case: बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा (Shahrukh Khan)  मुलगा आर्यन खान ( Aryan Khan )  ड्रग्जप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाकडून 'NCB'ला दिलासा मिळाला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 31 मार्च- Aryan Khan Drugs Case: बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा (Shahrukh Khan)  मुलगा आर्यन खान ( Aryan Khan )  ड्रग्जप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीच्या ( NCB)  एसआयटीने सोमवारी मुंबई सत्र न्यायालयाकडे अतिरिक्त 90 दिवसांची मुदत मागितली होती. आता याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाकडून एनसीबीला काहीसा दिलासा मिळाला आहे. आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयाने एनसीबीच्या ( NCB)  एसआयटीला 60 दिवसाची मुदतवाढ  दिली आहे.

आर्यन खान ड्रग्जप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याची आज शेवटचा दिवस होता. यासाठी एनसीबीच्या एसआयटीने काही दिवासाची मुदत मागितली होती. कारण काही महत्त्वाचे जबाब नोंदवून घ्यायचे होते. ड्रग्जप्रकरणी आर्यनसह 20 जाणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. आता याप्रकरणी एनसीबीला काहीसा दिलासा मिळाला आहे.

वाचा-क्रिस रॉकला थप्पड मारणं विल स्मिथला भोवणार, ऑस्कर अकादमीचा कारवाईचा निर्णय

2021 मध्ये सगळ्यात जास्त सोशल मीडियावर आर्यन खानची चर्चा झाली. एनसीबीनं आर्यन खानला  ड्रग्जप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ पार्टीतील आर्यन खानसह अन्य 20 जणांना ताब्यत घेण्यात आलं होत. यानंतर यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले. 25 दिवसानंतर आर्यन खानला याप्रकरणी जामीन मिळाला होता. याप्रकरणात आर्यन खान सोबत  अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा यांचा देखील समावेश होता. या सगळ्या प्रकरणात बॉलिवूड शाहरूख व आर्यन खानच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले दिसले. सोशल मीडियावर अनेकांनी खुलेआम आर्यनला पाठींबा दिल्याचे दिसले.

First published:

Tags: Aryan khan, Bollywood News, Entertainment, Shahrukh khan