मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: क्रांती रेडकरच्या समर्थनार्थ पुढे आली माजी Bigg Boss विजेती; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर साधला निशाणा

VIDEO: क्रांती रेडकरच्या समर्थनार्थ पुढे आली माजी Bigg Boss विजेती; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर साधला निशाणा

समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांनंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. यानंतर बिग बॉस फेम मराठमोळी अभिनेत्री मेघा धाडेने देखील क्रांतील पाठिंबा दिला देत राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यावर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांनंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. यानंतर बिग बॉस फेम मराठमोळी अभिनेत्री मेघा धाडेने देखील क्रांतील पाठिंबा दिला देत राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यावर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांनंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. यानंतर बिग बॉस फेम मराठमोळी अभिनेत्री मेघा धाडेने देखील क्रांतील पाठिंबा दिला देत राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यावर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई. 27 ऑक्टोबर : आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे (Aryan Khan Drugs Case) महाराष्ट्रीतील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. या प्रकराणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. या गंभीर आरोपांनंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. परंतु, या संपूर्ण प्रकरणात हळूहळू का होईना मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार क्रांतीला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत. बिग बॉस फेम मराठमोळी अभिनेत्री मेघा धाडेने (marathi actress megha dhade) देखील क्रांतील पाठिंबा दिला आहे. यासोबतच तिने या प्रकरणावरून राष्ट्रवादी नेते नवाब मलिकांचे नाव न घेत थेट निशाणा साधला आहे.

मेघाने तिच्या इन्स्टावर एक व्हिडिओ पोस्ट करत क्रांतीला पाठिंब दर्शवला आहे. ती म्हणतेय की, " नमस्कार मी मेघा धाडे. आज मी कोणतीही मनोरंजन विश्वातील माहिती देण्यासाठी किंवा अवांतर चर्चा करण्यासाठी आलेले नाही. तर आज मला जाणून घ्यायचंय की, आपल्याला कसा समाज हवाय? आपल्याला अशी सोसायटी हवी आहे का जिथे एक माणूस सत्यासाठी उभा आहे. जो समाजातील वाईट प्रवृत्तींना संपवण्यायचा प्रयत्न करतोय. पण, तीच वाईट प्रवृत्ती असलेले काही समाज कंटक त्यांच्या पाठी लागले आहेत. त्याचा मानसिक छळ करतात. त्याच्या कर्तव्य दक्षतेवर,चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. जर हे असं असेल तर मग अशा समाजात आपण स्वत: ही सुरक्षित नाही. जे न्यायाची, आपली सुरक्षा करतात त्यांच्याच वाट्याला एवढी विटंबना येत असेल. तर, एक सामान्य माणसाचं जगणं कसं असू शकतं या समाजात? मी आज एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांच्याविषयी बोलायला आले.

वाचा : चित्रपटांपासूनदूर असणारी पूजा बत्रा कशी कमावते कोट्यवधी रुपये? जाणून घ्या डिटेल्

पुढे ती म्हणते आहे की, ज्यांच्या नावाची गेल्या काही दिवसात खूप चर्चा आहे. एक कर्तव्य दक्ष म्हणून त्यांची जी ख्याती आहे. त्याच्यावर आज कोणी तरी शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करतंय हे खरंच खूप संताप आणणारं आहे. अशा वेळी त्यांच्या कुटुंबियांना वेठीस धरलं जातंय. आता मी त्यांच्या वडिलांचा व्हिडीओ पाहिला जे स्वत: एक कर्तव्यदक्ष पोलीस होते. ते एका मुलाखतीत त्यांची जात, धर्म यांचं सर्टिफिकेट दाखवत होते. मला इतका संताप आला. तुम्ही चोर सोडून संन्याशाला फाशी देताय. जे समाज कंटक हे सगळं करतायेत ते कोण आहेत हे न समजण्याइतके आपण नासमज नाही. जे या सगळ्या वाईट गोष्टींमध्ये आहेत ते मुद्दाम या माणसाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची जात, धर्म, लग्न, त्यांची दिवंगत आईचा धर्म या सगळ्या गोष्टी खोदून काढून त्या माणसाला त्रास दिला जातोय. मला सांगा एवढा मोठा ऑफिसर केवळ 8 कोटींच्या खंडणीसाठी असं करेल का?. खंडणी शब्द त्यांच्यासोबत जोडला जाणंच चुकीचं आहे. जो अरबो रुपये कमवू शकतो तो काही कोटींसाठी असं करेल का?. अशा ऑफिसरवर असे आरोप लागत असतील तर मग आपल्या सारख्या सामान्य लोकांनी काय करायचं.

View this post on Instagram

A post shared by Megha Dhade (@meghadhade)

आज ड्रग्स सर्रास रस्त्यावर विकले जात आहेत. ड्रग्स पेडरलचा सुळसुळाट झाला आहे. शाळा, कॉलेज यांच्याबाहेर पिढीच्या पिढी नासवल्या जात आहेत. आणि, एक सच्चा माणूस हे सगळं संपवण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या माणसाला अशा पद्धतीने त्रास दिला जातोय. ही त्रास देणारी माणसं दुसरी-तिसरी कोणी नसून हा धंदा चालवणारे किंवा या धंद्यातून त्यांचा फायदा होणारे लोकच करच आहेत. हे आपण का समजून घेत नाही? या लोकांना नष्ट करण्यासाठी समीर वानखेडेसारखा ऑफिसर निघाला आहे. पण, त्यांना साथ देण्याऐवजी हे जे लोक त्यांना त्रास देत आहेत त्यांच्या बातम्या आपण बघत बसलोय. जे ट्विटरवर ट्विटरबाजी करत आहेत. किंवा, दुसऱ्या कुठल्या प्रसार माध्यमांना मिस लीड करत आहेत. खोटी माहिती किंवा मनच्या काहीही गोष्टी सांगून समीर वानखेडे करप्ट आणि फ्रॉड माणूस , असं सांगून त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांना आपण आपला नेता म्हणून किंवा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कसं काय निवडू शकतो, असं म्हणत मेघाने नवाब मलिक यांचे नाव न घेता थेट निशाणा साधला आहे.

वाचा : Bigg Boss Marathi: 'तू फेक संचालक' जयने विकासला पुन्हा डिवचलं;तर उत्कर्षने विशाल

तसेच क्रांती तू खंबीर आहेस ..माझा तुला पाठिंबा आहे..असं देखील मेघा शेवटी म्हणताना दिसत आहे.क्रांती रेडेकरने पत्रकार परिषद घेऊन तिची बाजू मांडली आहे. यानंतर आता मराठीतील काही कलाकार तिला पाठिंबा दर्शवण्यासाठी समोर येत आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Nawab malik