मुंबई, 28 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan drugs case) याला झालेली अटक. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB on Aryan Khan case) काही दिवसांपूर्वी एका क्रूझवर सुरु असलेल्या पार्टीत छापा टाकला आणि यामधून काही जणांना अटक करण्यात आली. यामध्ये आर्यन खान याचाही समावेश होता. यानंतर आर्यन खानला तुरुंगातही जावं लागलं. मात्र अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज आर्यन खानला जामीन (Bail to Aryan Khan) मंजूर करण्यात आला आहे. आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर शाहरुख खान आणि वकील सतीश मानेशिंदे (Advocate Satish Maneshinde) यांच्या टिमसोबतचे फोटो (Shahrukh Khan photos with Satish Maneshinde and team) समोर आले आहेत.
3 ऑक्टोबर रोजी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका हायप्रोफाईल क्रूझवरील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती. या ड्रग्स प्रकरणामुळे आर्यनसह इतर 7 जणांना कस्टडीत ठेवण्यात आलं होतं. त्यांनतर या प्रकरणाला अतिशय गंभीर वळण लागलं होतं. यामध्ये दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. इतकंच नव्हे तर अभिनेत्री अनन्या पांडेच नावसुद्धा यामध्ये होतं पुढं आलं होतं. आर्यन आणि अनन्याचे व्हॉट्सअप चॅट्स समोर आले होते. त्यामुळे एकच खळबळ माजली होती.
त्यातच आर्यनला जमीन न मिळाल्यामुळे त्याची रवानगी ही तुरुंगातही झाली होती. अनेक दिवसांपासून काही ना काही कारणास्तव आर्यनचा जामीन टळत होता. मात्र वकिलांच्या प्रयत्नांमुळे आर्यनला आज जामीन देण्यात आला. यानंतर शाहरुख खान आणि त्याच्या वकिलांच्या टिमसोनट काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये वकील सतीश मानेशिंदे आणि त्यांच्या टीमसोबत सुपरस्टार शाहरुख खान आहे.
"आर्यन शाहरुख खानची अखेर हायकोर्टाने जामिनावर सुटका केली आहे. 2 नोव्हेंबर 2021 रोजी त्याला ताब्यात घेण्यात आले तेव्हापासूनच कोणताही गोष्टी आमच्या बाजूनं नव्हत्या.तरीही न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी आमची प्रार्थना स्वीकारली आणि आर्यनला जामीन दिला याबद्दल आम्ही आभारी आहोत. सत्यमेव जयते." असं सतीश मानेशिंदे आणि आर्यनच्या कायदेशीर टीमनं आपल्या निवेदनात म्हंटलं आहे.
Aryan Khan has ultimately been released on bail by Bombay HC. No possession, no evidence, no consumption, no conspiracy, right from first moment when he was detained on Oct 2! Satya Meva Jayate: Legal team of lawyer Satish Maneshinde who represented Khan in drugs-on-cruise case pic.twitter.com/nQ1YeaSVq0
— ANI (@ANI) October 28, 2021
कोण आहेत आर्यन खानचे वकील
आर्यन खानच्या वकिलांचं नाव सतीश मानेशिंदे आहे. मानशिंदे हे भारतातील एक प्रसिद्ध फौजदारी वकील आहेत. राजकारणी, अभिनेते आणि ख्यातनाम व्यक्तींसाठी खटले सोडवणारे ते उच्च प्रोफाइल वकील आहेत. संजय दत्तसाठी "1993 मुंबई बॉम्बस्फोट" आणि अभिनेता सलमान खानसाठी "ड्रंक ड्रायव्हिंग" केस यांसारखी अनेक हायप्रोफाईल प्रकरणे त्यांनी हाताळली. त्याने दोन्ही सुपरस्टारचा बचाव केला आहे. यावेळी सतीश मानेशिंदे हे आर्यन खानच्या बचावासाठी प्रयत्न करताना दिसले आणि म्हणूनच आर्यन खानला जामीन मंजूर झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.