मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Aryan Khan आणि Ananya Pandayचं नवीन व्हॉट्सऍप चॅट आलं समोर; ड्रग्सवर चर्चा करताना दिसले सेलेब्रिटी किड्स

Aryan Khan आणि Ananya Pandayचं नवीन व्हॉट्सऍप चॅट आलं समोर; ड्रग्सवर चर्चा करताना दिसले सेलेब्रिटी किड्स

 बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन(Aryan Khan Drugs Case) खानच्या ड्रग्स प्रकरणात जामीनावर आज सुनावणी आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन(Aryan Khan Drugs Case) खानच्या ड्रग्स प्रकरणात जामीनावर आज सुनावणी आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन(Aryan Khan Drugs Case) खानच्या ड्रग्स प्रकरणात जामीनावर आज सुनावणी आहे.

मुंबई,26ऑक्टोबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन(Aryan Khan Drugs Case) खानच्या ड्रग्स प्रकरणात जामीनावर आज सुनावणी आहे.मात्र तत्पूर्वी प्रकरणाला आणखी गंभीर स्वरूप आलं आहे. नुकताच अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Pandey) आणि आर्यन खानच्या चॅटसंबंधी नवी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे अनन्या पांडेच्या अडचणींत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.

आर्यन खानच्या प्रकरणाला दिवसेंदिवस गंभीर वळण लागत आहे. या प्रकरणामध्ये अनेक आश्चर्यकारक खुलासे होत आहेत. काही दिवसांपासून अभिनेत्री अनन्या पांडेचं नाव या प्रकरणामध्ये समोर आलं होतं. त्यांनतर सलग ३ दिवस NCB ने अनन्याची चौकशी केली होती. एका व्हॉट्सऍप चॅटच्या आधारे अनन्याला चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. ही चॅटिंग आर्यन आणि अनन्यामध्ये झाली होती. त्यांनतर आज पुन्हा अनन्या आणि आर्यन खानचं नवं व्हॉट्सऍप चॅट समोर आलं आहे. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

काय आहे हे चॅट-

आर्यन खान- तू गांजा घेऊन आली आहेस का?

अनन्या पांडे- हा मी आणत आहे.

आर्यन खान- मी गुपचूप तुझ्याकडून घेईन

या चॅटव्यतिरिक्त NCB आणखीही काही चॅट्स कोर्टात सादर केले आहेत. त्यामुळे या सर्वांचा परिणाम आज होणाऱ्या सुनावणीवर दिसून येऊ शकतो. NCB अनन्या पांडेशी एक सप्लायर म्हणून चौकशी करत आहेत. सलग दोन दिवस अनन्याची चौकशी झाली आहे. या चॅट्सनांतर पुन्हा तिची चौकशी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

काय होतं या आधीचं चॅट-

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबी (NCB) ज्या व्हाट्सअॅप चॅट्सचा हवाला देऊन अनन्या पांडे (Ananya Panday) हिची चौकशी करीत आहेत, ते आर्यन खान (Aryan Khan) आणि अनन्या पांडे यांच्यामधील आहे. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये (WhatsApp Chat) आर्यन खान आणि अनन्या पांडे गांजाबद्दल बोलत होते.सूत्रांच्या मते त्यांच्यामध्ये पुढील बोलणं झालं आहे,

आर्यन खान, अनन्या पांडेला विचारतो- If Ganja can be arrange.

यावर अनन्या पांडे म्हणते - She will arrange

First published:

Tags: Ananya panday, Aryan khan, Drugs, NCB