Home /News /entertainment /

'डर्टी पिक्चर'मधील अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू; संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

'डर्टी पिक्चर'मधील अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू; संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

‘लव सेक्स और धोखा’ आणि ‘डर्टी पिक्चर’ सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकरलेली अभिनेत्री आर्या बनर्जी (Arya Banerjee) हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 11 डिसेंबर : ‘लव सेक्स और धोखा’ आणि ‘डर्टी पिक्चर’ सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकरलेली अभिनेत्री आर्या बनर्जी (Arya Banerjee) हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक कडक केला आहे. अभिनेत्री आर्या बनर्जीचा मृतदेह दक्षिण कोलकात्यातील जोधपुर पार्क येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये सापडला. त्याच्या मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडला. देवदत्ता बनर्जी अथवा आर्या यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शुक्रवारी या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्याच्या घरातील काम करणारी महिला त्या दिवशी कामासाठी गेली होती. मात्र अनेकवेळा कॉल करुनही कोणीच फोन उचलला नाही. संशयास्पद वाटत असल्याने ती महिला पोलीस ठाण्यात पोहोचली व त्यांना याबाबत माहिती दिली. याची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. आर्याचा फ्लॅट आतून बंद होता. पोलीस फ्लॅटचा दरवाजा तोडून आत शिरले. घरातील एका खोलीत आर्याचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेला होता. तिच्या नाकातून रक्त येत होतं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. डर्टी पिक्चरमध्ये विद्या बालन आणि नसरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. तर 'लव सेक्स और धोखा' मध्ये राजकुमार राव आणि नुसरत भरुचा यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिबाकर बनर्जी यांनी केलं होतं. आर्या बनर्जी सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. ती आपल्या चाहत्यांना नेहमी अपडेट ठेवत होती. तिच्या मृत्यूनंतर चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. आर्या बॅनर्जीने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. तिच्या मृत्यूमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
    First published:

    Tags: Bollywood News, Breaking News

    पुढील बातम्या