मुंबई, 05 जानेवारी : रामायण या प्रसिद्ध मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. अरुण गोविल यांनी साकारलेल्या रामाच्या दर्जेदार भूमिकेमुळे लोकांनी त्यांना खऱ्या प्रभू श्रीरामांचा दर्जा दिला. आजही अरुण गोविल कुठेही दिसले तरी लोक त्यांचे पाय धरायला जातात. अरुण गोविल आता सिनेजगातात फारसे सक्रीय नसले तरी त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. अरुण गोविल यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात अभिनेते ढसाढसा रडताना दिसत आहेत. अरुण गोविलना भेटताच स्वामी जगद्गुरू रामभद्राचार्य यांचा बांध फुटला. स्वामी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना रडताना पाहून अरुण गोविल देखील रडायला लागले. दोघांचा हा भावुक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, रामभद्राचार्य जी अभिनेते अरुण गोविल यांच्या हृदयाशी घरून रडत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अरुण गोविल यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या सत्संगाला हजेरी लावली होती. सत्संगानंतर अरुण गोविल यांनी स्वामींच्या पाया पडले तसं स्वामींनी अरुण गोविल यांना हृदयाशी धरलं. अरुण गोविल यांनीही स्वामींना मिठी मारली आणि त्यांच्या कुशीत तेही रडू लागले. काही क्षणांचा हा व्हिडीओ सर्वांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.
हेही वाचा - Akshay Kumar : अक्षय कुमारने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट; 'या' विषयावर रंगली अर्धा तास चर्चा
राम जी का अभिनय करने वाला भी हम सबके लिए प्रभु का रूप हैं 🙏🏻💐 रामभद्राचार्य जी महाराज अरुण गोविल जी को गले लगा कर रो दिए🙏🏻😥 pic.twitter.com/o1raEEWWF5
— Harsha Patel 🇮🇳 (@harshasherni) January 4, 2023
अभिनेते अरुण गोविल यांना भेटल्यानंतर जगद्गुरूंनी आनंद व्यक्त केला. त्यांनी अभिनेत्याचं कौतुक करत म्हटलं, 'तु अभिनय करत होतास. पण या बंद डोळ्यांनी मला प्रभू श्री रामांचं स्वरुप दिसत होतं'. स्वामींच्या या वाक्यानंतर अरुण गोविल यांनी नतमस्तक होत 'ही फक्त तुमची कृपा आहे', असं म्हटलं.
जगद्गुरूंनी म्हटलंय, 'अनेकांनी लोकांनी अरुणला पाहिलं आहे. पण तो जेव्हा रामाचा अभिनय करायचा तेव्हा त्याच्यात तो आवेश असायचा. जो पर्यंत भारतात रामत्व येत नाही तोपर्यंत भारताच्या कल्याणाची कल्पनाही करता येत नाही. राघव माझ्या आयुष्याचं मोठं लक्ष्य आहे. मी घेतल्यानंतर माझे डोळे गेले. वयाच्या 5 व्या वर्षी मी संपूर्ण गीता लक्षात ठेवली. त्यानंतर वयाच्या 7व्या वर्षी मी संपूर्ण राम चरित्र लक्षात ठेवलं. मला केवळ धर्म, काम आणि कुमार राम हवा आहे'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Marathi news, Social media, Top trending, Viral videos