'डॅडी' पाहायला येणार अरूण गवळी

'डॅडी' पाहायला येणार अरूण गवळी

सिनेमा पहायला खुद्द अरूण गवळीला येता यावं म्हणून निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेटच पुढे ढकलली आहे.

  • Share this:

04जुलै : हल्ली बॉलिवूडमध्ये डॉनच्या आयुष्यांवर सिनेमा बनायचा ट्रेन्ड आलाय. मग 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' असेल किंवा 'हसीना पारकर'. आता डॅडी नावाचा एक सिनेमा अरूण गवळीच्या आयुष्यावर येतोय. हा सिनेमा पहायला खुद्द अरूण गवळीला येता यावं म्हणून निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेटच पुढे ढकलली आहे.

अरूण गवळीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या डॅडी या सिनेमात अर्जुन रामपाल प्रमुख भूमिकेत आहे. एखाद्या गुंडाला हिरो करून त्याचं गौरवीकरण करणं कितपत योग्य आहे हा एक वादच आहे. त्यामुळे चित्रपटावर सगळीकडून टीका होतेच आहे. हा सिनेमा आधी 21जुलैला रिलीज होणार होता.पण अरुण गवळीची सप्टेंबरमध्ये पॅरोलवर सुटका होऊ शकते. तसं झाल्यास त्याला हा सिनेमा पाहता येईल. याचसाठी गीता गवळीनं अर्जुन रामपालची भेट घेतली होती आणि सिनेमाची रिलीज डेट पुढं टाकायची इच्छाही व्यक्त केली होती.

त्यामुळे हा सिनेमा आता 8 सप्टेंबरला रिलीज होतोय.

सध्या अरूण गवळी आपल्या कुटुंबासोबत हा सिनेमा येऊन पाहणार असल्याची चर्चा सगळीकडे चाललीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2017 03:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading