गुरूची नवी खेळी, आता क्रिकेटचे डावपेच!

गुरूनं राधिकाची नोकरी सोडली, आता राहतं घरही सोडतोय. पण तुम्हाला अजून एक बातमी आम्ही देतोय. ती म्हणजे गुरू क्रिकेटही खेळणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 29, 2018 04:28 PM IST

गुरूची नवी खेळी, आता क्रिकेटचे डावपेच!

मुंबई, 29 डिसेंबर : सध्या गुरुनाथ सुभेदार एकदम अँग्री यंग मॅन बनलाय. त्यानं राधिकाची नोकरी सोडली, आता राहतं घरही सोडतोय. पण तुम्हाला अजून एक बातमी आम्ही देतोय. ती म्हणजे गुरू क्रिकेटही खेळणार आहे.

आम्ही गुरूची भूमिका करणाऱ्या अभिजीत खांडकेकरबद्दल बोलतोय. काही दिवसांपूर्वीच 'मी पण सचिन' या सिनेमाचा टीझर रिलीज झाला. टीझर पाहून चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली असतानाच आता चित्रपटाचे नवीन पोस्टर आले आहे. या पोस्टरमध्ये स्वप्नील जोशीसोबत अभिजीत खांडकेकरही झळकत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील आक्रमक हावभाव बघून ही भूमिकाही विशेष असणार, याचा आपण अंदाज बांधू शकतो.


खरं तर क्रिकेट आणि आयुष्याचा खूप जवळचा संबंध आहे. क्रिकेटमध्ये जसे शेवटच्या टप्प्यापर्यंत काही सांगता येत नाही, आयुष्यचंही अगदी तसंच असतं. क्रिकेट आणि आयुष्यातील हे साम्य दाखवणारा, प्रेम, नात्याची परिभाषा शिकवणारा आणि आपल्या स्वप्नांचा माग घेण्यास प्रवृत्त करणारा हा सिनेमा येत्या १ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटात स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर सोबत प्रियदर्शन जाधवही आहे. श्रेयश जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. इरॉस इंटरनेशनलद्वारे 'मी पण सचिन' या चित्रपटाचं जागतिक स्तरावर वितरणही केलं जाणार आहे.

Loading...

नुकतंच या चित्रपटाचं प्रमोशनल साँग चित्रित करण्यात आलं. हे गाणं आहे ‘आयला आयला सचिन' .सचिनच्या फॅन्ससाठी हे गाणं एक पर्वणीच ठरणार आहे.

स्वप्नील जोशी म्हणतो की, हा सिनेमा फक्त क्रिकेटवर आधारित नसून आयुष्यावर पण तितकाच आधारित आहे. कारण आयुष्य आणि क्रिकेटमध्ये खूप साम्य असतं. क्रिकेट आणि आयुष्यात आपण पुढच्या क्षणाला काय होईल याचा अंदाज बंधू शकत नाही. सिनेमा 1 फेब्रुवारीला रिलीज होईल.


Year Ender 2018 : अनाजी पंतांनी 'इथे'ही घातला धुमाकूळ!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2018 04:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...