फक्त आहिलचा मामाच नाही तर या मुलांचा आजोबाही झालाय सलमान खान

फक्त आहिलचा मामाच नाही तर या मुलांचा आजोबाही झालाय सलमान खान

काही दिवसांपूर्वी कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये गेला होता. यावेळी त्याने अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

  • Share this:

मुंबई, 04 जून- सध्या सलमान खान त्याच्या आगामी 'भारत' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याचसाठी तो काही दिवसांपूर्वी कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये गेला होता. यावेळी त्याने अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. विशेष म्हणजे या शोचा सलमान निर्माताही आहे. यावेळी कपिलने सलमानला असा काही प्रश्न विचारला की, त्याचं उत्तर ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं.

कपिल सलमान म्हणाला की, ‘आम्हा सगळ्यांनाच माहितीये की तुला लहान मुलं किती आवडतात. तुझे लहान मुलांसोबतचे अनेक फोटो आम्ही सोशल मीडियावर पाहत असतो. भावंडांच्या कृपेने तू काका आणि मामा झालास. मुलांना उचलताना त्यांनी कधी तुझ्यावर सुसू केली आहे का?’ या प्रश्नाचं उत्तर देताना सलमान म्हणाला की, ‘जितकीही मुलं आहेत सर्वांनी पाळीपाळीने माझ्यावर सुसू केली आहे. बरं एकदाच नाही तर अनेकदा केलीये.’

Makeup Official Teaser- दारू पिऊन घरातल्यांना शिव्या देतेय रिंकू राजगुरू

'या' घरगुती उपायांनी रिंकूने दोन महिन्यात कमी केलं 12 किलो वजन

सलमान पुढे म्हणाला की, ‘मी फक्त काका आणि मामाच नाही झालोय तर माझी अशी अनेक चुलत भावंडं आहेत जे माझ्याहून वयाने मोठे आहेत. त्यांच्या मुलांची लग्न झाली असून त्यांनाही मुलं झाली आहेत. त्यामुळे मी आजोबाही झालो आहे. आता तर अशी स्थिती आहे की त्यांनाही मुलं होतील आणि पुढच्या तीन- चार वर्षात मी पंजोबा होईन. कारण पठाण लोकांमध्ये लग्न लवकर करतात.’ सलमानच्या या उत्तराने कपिलसह सारेच हसायला लागले.

रुग्णालयात भरती झाली सलमान खानची हिरोइन, PHOTO VIRAL

सलमानसोबत या शोमध्ये कतरिनाही आली होती. दोघांनी मिळून शोमध्ये एक वेगळीच रंगत भरली. 'भारत' सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर उद्या अर्थात ५ जून रोजी हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमानचे पाच वेगवेगळे लुक असून कतरिनासोबतचा सलमानचा हा सहावा सिनेमा आहे.

प्रियकराच्या मृत्यूने कोसळली होती मिलिंद सोमणची बायको, लग्नासाठी असं मनवलं घरच्यांना

SPECIAL REPORT : शिवरायांबद्दल वादग्रस्त टि्वट करण्याचा पायलचा हेतू काय?

First published: June 4, 2019, 11:08 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading