मनसेची 'दुनियादारी', 'चेन्नई एक्स्प्रेस'ला थांबवा नाहीतर..

मनसेची 'दुनियादारी', 'चेन्नई एक्स्प्रेस'ला थांबवा नाहीतर..

  • Share this:

mns on chenni express31 जुलै : 'दुनियादारी' हा मराठी सिनेमा काढून 'चेन्नई एक्स्प्रेस' सिनेमाचा शो लावला तर सिनेमागृह बंद पाडू अशी धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेनं मुंबईतल्या सिंगल स्क्रीन थिएटर्सचालकांना दिलीय. मनसे उद्या यासाठी आंदोलन करणार आहे असं मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांनी सागितलंय. दिग्दर्शक रोहित शेट्टी दिग्दर्शित चेन्नई एक्सप्रेस हा सिनेमा येत्या आठ ऑगस्टला प्रदर्शित होतोय.

 

या सिनेमात शाहरूख खान, दिपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका आहे. विशेष म्हणजे किंग खान या सिनेमात असल्यामुळे देशभरात एकाच वेळी हजारो मॉल आणि थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रत्येक वेळा एखादा मोठा हिंदी सिनेमा रिलीज होत असेल तर बाकीच्या सिनेमांना थिएटर्समध्ये जागाच मिळत नाही. त्यातच मराठी सिनेमाची व्यथा याहूनही भयंकरच असते. दुनियादारी सिनेमा मुंबईत मोजक्याच स्क्रीनवर झळकतोय आणि त्यातही दुसर्‍याच आठवड्यात चेन्नई एक्स्प्रेस 'येत' असल्यामुळे मनसेच्या 'इंजिन'ने 'दुनियादारी'साठी ब्रेक लावलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2013 05:38 PM IST

ताज्या बातम्या