आजही हे सिनेमे पाहिले तर तुम्ही पुन्हा काश्मीरच्या प्रेमात पडाल!

आजही हे सिनेमे पाहिले तर तुम्ही पुन्हा काश्मीरच्या प्रेमात पडाल!

जम्मू- काश्मीर राज्यातून कलम 370 हटवल्याची सध्या देशभर चर्चा आहे. असं म्हटलं जातं की, या निर्णयानंतर काश्मीर राज्यात अमुलाग्र बदल होतील.

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट- जम्मू- काश्मीर राज्यातून कलम 370 हटवल्याची सध्या देशभर चर्चा आहे. असं म्हटलं जातं की, या निर्णयानंतर काश्मीर राज्यात अमुलाग्र बदल होतील. पूर्ण राज्याच्या नकाशावरही याचा परिणाम होईल. कारण आता काश्मीरपासून लडाखला वेगळं केलं जाणार आहे. लडाख हे काश्मीरमधील सर्वात सुंदर जागांपैकी एक मानलं जातं. जे काश्मीरला फिरायला जातात ते हमखास लेह- लडाखला आवर्जुन भेट देतात. पण आजही अनेकांनी काश्मीर आणि लडाख हे फक्त सिनेमांमध्येच पाहिलं आहे. जाणून घेऊ कोणत्या सिनेमांत काश्मीरचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.

बजरंगी भाईजान- सलमान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि हर्षाली मल्होत्रा स्टारर बजरंगी भाईजान सिनेमाचं चित्रीकरण काश्मीरमध्ये करण्यात आलं होतं. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात काश्मीरचं निसर्गरम्य सौंदर्य पाहून सर्वच काश्मीरच्या पुन्हा एकदा प्रेमात पडले होते.

हायवे- इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमाचं बहुतांशी चित्रीकरण काश्मीरमध्ये करण्यात आलं होतं. या सिनेमात वेगवेगळी स्थळं दाखवण्यात आली होती. पण प्रेक्षक सर्वात जास्त प्रेमात पडले ते काश्मीरच्याच.

फितूर- कतरिना कैफच्या सौंदर्यावर जर कधी कोणी वरचढ चढलं असेल तर ते फक्त काश्मीरचं सौंदर्य. फितूर सिनेमात काश्मीर मुळात किती सुंदर आहे हे दाखवण्यात आलं आहे. हा सिनेमा आजही काश्मीरचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी बघितला जातो. आदित्य रॉय कपूर, तब्बू आणि कतरिना कैफच्या मुख्य भूमिका या सिनेमांत होत्या.

ये जवानी है दिवानी- सिनेमातील एका सीनमध्ये दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर, एवलिन शर्मा आणि कल्की कोचलीन आणि संपूर्ण टीम मनाली फिरायला जातात. त्या ट्रीपचं चित्रीकरण गुलमर्ग काश्मीरमध्ये झालं होतं. काश्मीरमधील निसर्गरम्य दृश्यांना लोकांनी मनालीचं दृश्य समजलं होतं.

3 इडियट्स- या सिनेमातील अनेक दृश्यांमध्ये काश्मीरचं सौंदर्य दाखवण्यात आलं आहे. आमिर खानला शोधत त्याचे मित्र लडाखच्या एका शाळेत पोहोचतात. तिथलं सौंदर्य पाहून ते त्या जागेच्या प्रेमात पडतात. याचं चित्रीकरण काश्मीरच्या लडाखमध्ये झालं होतं.

हिना- ऋषी कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियार यांच्या या सिनेमाचं बहुतांशई चित्रीकरण काश्मीरमध्ये झालं होतं. बॉलिवूडच्या सुंदर सिनेमांपैकी एक अशी हिना सिनेमाची आजही ओळख आहे.

आतापर्यंत काश्मीरमध्ये 50 हून अधिक सिनेमांचं चित्रीकरण झालं आहे. यात विशाल भारद्वाज यांच्या हैदर सिनेमाचाही समावेश आहे. पण या सिनेमात काश्मीरचं सौंदर्य कमी आणि तिथल्या प्रश्नांवर अधिक भाष्य केलं गेलं होतं.

याशिवाय मिशन कश्मीर, राझी, लक्ष्य, कश्मीर की कली हूं मैं, ते हमीद, नोटबूक आणि जॉली एलएलबी २ चे काही सीन काश्मीरमध्ये शूट करण्यात आले आहेत.

Article 370 : जायरा वसीमने केलं ट्वीट, 'ये वक्त भी गुजर जाएगा'

पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं भारतीय सेनेवर आक्षेपार्ह ट्वीट, सुरू झालं ट्विटर वॉर

‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा’ या 11 डायलॉगने काढली पाकची इज्जत

VIDEO: नेते नजरकैदेत, कलम 144 लागू; काय आहे जम्मूची आताची स्थिती?

First published: August 5, 2019, 6:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading