Article 370 : जायरा वसीमने केलं ट्वीट, 'ये वक्त भी गुजर जाएगा'

Article 370 : जायरा वसीमने केलं ट्वीट, 'ये वक्त भी गुजर जाएगा'

गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव सादर केला. यासोबतच त्यांनी राज्य पुनर्रचनेचा प्रस्तावही मांडला.

  • Share this:

काश्मीर, 05 ऑगस्ट- आज संपूर्ण देशाचं लक्ष काश्मीरवर आहे. माडी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फेंस (NC) नेते उमर अब्दुल्ला यांना रविवारी (4 ऑगस्ट) रोजी मध्यरात्री नजरबंद केलं. या तणावग्रस्त वातावरणात झायरा वसीमने ट्विटरवर लिहिलं की, ‘ही वेळही निघून जाईल.’ झायराआधी बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनीही ट्वीट करत लिहिलं की, ‘काश्मीरच्या समस्येवर उपाय मिळाला.’

तर अभिनेता संजय सुरीने लिहिले की, ‘कश्मीरमधील सर्व लोकांनी आपली काळजी घ्यावी.’ सुरक्षेच्या कारणावरून काश्मीरमध्ये सरकारकडून काही निर्णय घेतले गेले. सध्या तिथली इंटरनेट सेवाही बंद करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. याआधी सरकारने अंबरनाथ यात्राही रद्द करत पर्यटकांना लवकरात लवकर काश्मीर सोडण्याचे आदेश दिले होते.

सध्या जम्मू- काश्मीरमधील वातावरण तणावपूर्ण असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव सादर केला. यासोबतच त्यांनी राज्य पुनर्रचनेचा प्रस्तावही मांडला. याआधी रविवारी मध्यरात्री माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फेंस नेता उमर अब्दुल्ला यांना नजरबंद करण्यात आल्याचा दावा काँग्रेस नेते उस्मान माजिद आणि मार्कवादी कम्युनिस्ट पार्टी (CPM) नेते एम. वाई. तारिगामी यांनी केला.

पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं भारतीय सेनेवर आक्षेपार्ह ट्वीट, सुरू झालं ट्विटर वॉर

Bigg Boss Marathi 2- बिग बॉस मराठीच्या घरामधून रूपाली भोसले बाहेर!

लहान मुलाला सोडून लंच डेटला गेली 'ही' बॉलिवूड जोडी

लोक म्हणायचे काही दिवसही टिकणार नाही अजय- काजोलचं लग्न, आज आहे ‘हिट कपल'

VIDEO: नेते नजरकैदेत, कलम 144 लागू; काय आहे जम्मूची आताची स्थिती?

Published by: Madhura Nerurkar
First published: August 5, 2019, 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading