'अबराम'चं गर्भलिंग निदान केलं नाही'

'अबराम'चं गर्भलिंग निदान केलं नाही'

  • Share this:

srk family09 जुलै : माझा मुलगा अबरामच्या जन्माआधी गर्भलिंग निदान केलं नाही. गर्भलिंग निदान केल्याच्या बातम्या येण्याच्या आधीच अबरामचा जन्म झाला होता. गर्भलिंग निदान केल्याचा दावा हा असंवेदनशील आहे. सरोगसीने जन्म झाल्यामुळे मी अधिक माहिती देऊ शकत नाही पण मला असं स्पष्टीकरण द्यावं लागतंय, हे दुदैर्वी आहे असं स्पष्टीकरण अभिनेता शाहरूख खानने दिलंय. सरोगसीने जन्म झालेल्या बाळाचं नावं अबराम ठेवण्यात आलंय असंही त्यांने सांगितलं.

बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख आणि गौरी खान यांच्या घरी पुन्हा पाळणा हलणार यावरून बराच वाद रंगला होता. PCPNDT कायद्याअंतर्गत प्रसुती पुर्वलिंग निदान करण्यास कायद्यानं मज्जाव करण्यात आला असून सुद्धा शाहरुखने आपल्या मुलाचे गर्भलिंग निंदान केलं होतं असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी केलाय. यासंदर्भात शाहरुख विरोधात महापालिकेकडे तक्रारही करण्यात आलीय. शाहरूखनं PCPNDT कायद्याचा भंग केल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला होता. 'मिड डे' दैनिकात शाहरुख खानला सरोगसीच्या माध्यमातून मुलगा होणार असल्याची बातमी डॉक्टरांचा हवाला देऊन छापण्यात आली होती. या प्रकरणी शाहरूखची चौकशी करण्यात यावी असे आदेश आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिले होते. मात्र शाहरूखने सर्व आरोप फेटाळून लावले होते.

या सर्व प्रकरणानंतर खरंच शाहरुखने गर्भलिंग निदान चाचणी केलीय का? अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर 3 जुलै रोजी या सर्व चर्चेला पूर्णविराम मिळाला. सरोगसीद्वारे मुलाचा जन्म 27 मे रोजी झालाची नोंद मुंबई महापालिकेनं केलीय. त्यासंदर्भात तिसर्‍या बाळाचं जन्म प्रमाणपत्र मुंबई महापालिकेनं दिलंय. या बाळाचा अर्थात अबरामचा जन्म अंधेरीतल्या महिलांसाठी मसरानी हॉस्पिटलमध्ये झाला आणि त्यानंतर त्याला नानावटी आणि नंतर ब्रीच कैंडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं.

मात्र शाहरूखने आपल्या झालेल्या आरोपामुळे व्यथीत होऊन स्पष्टीकरण दिलं. माझा मुलगा अबरामच्या जन्माआधी गर्भलिंग निदान केलं नाही. गर्भलिंग निदान केल्याच्या बातम्या येण्याच्या आधीच अबरामचा जन्म झाला होता असंही त्याने सांगितलं. तसंच गर्भलिंग निदान केल्याचा दावा हा असंवेदनशील आहे. पण मला याबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागतंय, हे दुदैर्वी आहे असंही शाहरूखने म्हटलंय. मात्र सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी शाहरूखचे दावे फेटाळून लावलेत. गर्भलिंग निदान केल्यानंतर प्रत्येक जण असंच स्पष्टीकरण देत पण शाहरुख सारख्या अभिनेत्यानं कायद्याची पायमल्ली केली असून त्याला कोर्टात याचे उत्तर द्यावे लागेल असं देशपांडे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2013 09:16 PM IST

ताज्या बातम्या