डॉक्टर हाथींच्या पहिल्या पुण्यतिथीला भावुक झाले जेठालाल, म्हणाले...

डॉक्टर हाथींच्या पहिल्या पुण्यतिथीला भावुक झाले जेठालाल, म्हणाले...

आज डॉक्टर हाथींच्या पहिल्या पुण्यातिथी निमित्त या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं डॉ. हाथींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

  • Share this:

मुंबई, 9 जुलै : लोकप्रिय टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा मागच्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. या शोमधील दयाबेनच्या परत येण्याची सर्व प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. पण या मालिकेत जेठालाल यांची भूमिका साकारणारे दिलीप जोशी मात्र एका वेगळ्याच व्यक्तीच्या आठवणीनं भावुक झाले. मागच्या वर्षी या मालिकेत डॉ. हाथी यांची भूमिका साकारणारे कवि कुमार आझाद यांचं निधन झालं 9 जुलैला झालं होतं. आज त्यांच्या पहिल्या पुण्यातिथी निमित्त या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं डॉ. हाथींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी सुद्धा डॉ. हाथींच्या आठवणींनी भावूक झालेले दिसले. कवि कुमार आझाद यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांना काय वाटलं याविषयी आपली प्रतिक्रिया दिली.

स्पॉटबॉयला दिलेल्या एका मुलाखतीत दिलीप जोशी म्हणाले, ‘कवि कुमार यांना जाऊन आज एक वर्ष झालं. जेव्हा मी निर्मल (नवे डॉक्टर) यांना पाहतो. त्या प्रत्येक वेळी मला कवि कुमार आझाद यांची आठवण येते. मी त्यांना खूप मिस करतो. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी लंडनला होतो. मला ही बातमी पहिल्यांदा असित मोदी यांनी दिली होती. त्यावेळी मला काय वाटलं हे मी शब्दात सांगू नाही शकत. माझ्या पायाखालची जमीन सरकतेय की काय असं मला वाटलं होतं. माझे पाय लटपटत होते. त्यांच्यासोबतचे मस्ती मजा केलेले क्षण मी अद्याप विसरू शकत नाही.’ हे सर्व सांगताना दिलीप जोशींच्या डोळ्यात पाणी तरळलं.

VIDEO : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली 'ही' निरागस गायिका आहे तरी कोण?

याशिवाय या मालिकेत कोमलची भूमिका साकारणाऱ्या अंबिका रंजनकर यांनीही कवि कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, ते माझ्या आठवणीत नेहमीच जिवंत राहतील. त्यांनी आमच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण सर्वांच्या लक्षात राहील. मागच्या वर्षी 7 जुलैला माझा वाढदिवस होता. त्यावेळी ते खूप खुश होते आणि त्यानंतर अवघ्या 2 दिवसांनी त्यांचं निधन झालं. सध्या तारक मेहतामध्ये नव्या दयाबेनच्या एंट्रीची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या भूमिकेसाठी अभिनेत्री विभूतील कास्ट केल्याचं बोललं जात होतं मात्र अभिनेत्रीनं तिच्या इन्स्टाग्रामवर ती ही मालिका करत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता दयाबेनच्या भूमिकेत कोण दिसणार याविषयी प्रेक्षकांमधील उत्सुकता कायम आहे.

हॉरर सिनेमा पाहताना थिएटरमध्येच मृत्यू, शेवटपर्यंत कोणाला समजलंच नाही!

=================================================================

EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर

First published: July 9, 2019, 6:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading