धर्मेंद्र यांना राज कपूर तर विजय चव्हाणांना व्ही शांताराम जीवनगौरव

धर्मेंद्र यांना राज कपूर तर विजय चव्हाणांना व्ही शांताराम जीवनगौरव

कलाक्षेत्रातल्या ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार तसेच राज कपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

  • Share this:

15 एप्रिल : राज्य सरकारचे राज कपूर आणि व्ही शांताराम पुरस्कार जाहीर करण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेद्र यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार तर दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलंय.

'मोरूची मावशी'फेम अभिनेते विजय चव्हाण यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलाय. अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार देण्यात आलाय. राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची आज घोषणा केली.

मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रातल्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा कलाक्षेत्रातल्या ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार तसेच राज कपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

जीवनगौरव पुरस्कार  ५ लाख रुपयाचा तर विशेष योगदान पुरस्काराचे रु.३ लाख रुपयाचा आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील चित्रपती व्ही शांताराम पुरस्कारासाठी सदस्य असलेल्या दिलीप प्रभावळकर, श्रीमती श्रावणी देवधर,  श्याम भूतकर तर राज कपूर पुरस्कारासाठी सदस्य असलेल्या  नाना पाटेकर, समीर(गीतकार),  सुरेश ऑबेराय आदी समितीने या मान्यवरांची सन २०१८ च्या पुरस्कारांसाठी निवड केली.

First published: April 15, 2018, 12:29 PM IST

ताज्या बातम्या