रिव्ह्यु : केदारचा नवा खेळ 'खो-खो'!

रिव्ह्यु : केदारचा नवा खेळ 'खो-खो'!

अमोल परचुरे, समीक्षक31 मे केदार शिंदेला फँटसीची आवड आहे हे तर सर्वांनाच माहित आहे. आधी नाटकांमधून आणि नंतर सिनेमांमधून फँटसी प्रकाराने त्याने प्रेक्षकांची भरपूर मनोरंजन केलंय. अर्थात, 'जत्रा' आणि 'अगं बाई अरेच्या'एवढा प्रतिसाद नंतर आलेल्या केदारच्या फँटसी सिनेमांना मिळू शकला नाही आणि म्हणूनच केदारने नव्या दमाने 'खो-खो' हा सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर केला. 'खो-खो' म्हणजेच 'लोच्या झाला रे' नाटक हे तर सर्वांना माहित आहेच. 'लोच्या झाला रे' नाटकात फँटसी तर होतीच पण रंगमंचीय शक्यतांचा कौशल्यानं विचार करुन एक वेगवान खेळ केदारने सादर केला होता. आता त्याच संकल्पनेवर सिनेमा तयार करताना यापूर्वीचा अनुभव केदारला उपयोगी पडलाय असं दिसतंय. एक खणखणीत कॉमेडी सिनेमाची भेट त्याने प्रेक्षकांना दिलेय असं नक्कीच म्हणता येईल.काय आहे स्टोरी ?'खोखो' सिनेमाचा नायक आहे भरत जाधव...आपल्या गावी असलेल्या वडिलोपार्जित वाड्यात तो राहायला येतो आणि संकटांची मालिकाच सुरु होते. आधी मेहता बिल्डरचे गुंड येऊन त्याला वाडा विकण्यासाठी धमकी देतात, मारहाण करतात आणि नंतर त्याला भेटायला येतात त्याचे पूर्वज, अगदी आदिमानवाच्या काळापासून... वाडा हे आपलं वैभव आहे. ते आपल्या हातून जायला नको यासाठी ते नायकामध्ये लढाऊ वृत्ती जागवण्याचा प्रयत्न करत असतात. सर्वसामान्य माणूस असलेला नायक गपगुमान वाडा बिल्डरच्या हाती देण्याचा विचार करत असतो. आदिमानव ते संयुक्त महाराष्ट्र लढयातील नेता असे पूर्वज त्याचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत असतात आणि याचाच नायकाला त्रास होत असतो. बरं, हे सगळे पूर्वज फक्त नायकालाच दिसत असल्यामुळे त्यामुळे निर्माण होणारी गंमत आणखी वाढत जाते. नवीन काय ?मूळ नाटकाशी या सिनेमाची तुलना करायची झालीच तर एवढंच सांगता येईल की, नाटकात असलेला वेग कायम राखण्यात केदारला अपयश आलंय. सिनेमा म्हटलं की, त्यात गाणी असलीच पाहिजेत असा विचार करायची गरज नव्हती. इंटरव्हलच्या आधी जेव्हा सिनेमा वाड्याबाहेर पडतो तेव्हा त्याचा वेग कमी होतो हेसुद्धा स्पष्टपणे जाणवतं. सिनेमा पूर्णपणे फँटसीवर आधारित असला तरी फँटसीचंही काही लॉजिक असतं. जे सिनेमात काही ठिकाणी पटत नाही किंवा बर्‍याचे वेळा प्रश्नही पडायला लागतात. इंटरव्हलनंतर प्रत्येक व्यक्तिरेखा भाषण दिल्याच्या थाटात किंवा प्रबोधन केल्याप्रमाणे संवाद बोलत राहतो. याचमुळे इंटरव्हलनंतर सिनेमाची लांबीसुद्धा थोडी जास्त आहे असं वाटायला लागतं. पण या सगळ्या त्रुटी सोडल्या तरी परफॉर्मन्सवर हा सिनेमा बाजी मारुन जातो आणि क्लायमॅक्सला तर भरतच्या अभिनयाचा अद्भुत नमुना बघून सगळ्या त्रुटी विसरायला लावतो. ऍक्टिंग -रिऍक्टिंग !भरत जाधव आणि सिध्दार्थ जाधव हे या सिनेमाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. आदिमानवाच्या वेषात सिद्धार्थची एंट्री झाल्यानंतर पूर्ण सिनेमात त्याचा धुमाकूळ प्रचंड धमाल आणतो. त्याची ऊर्जा थक्क करणारी आहे आणि तेवढ्याच ऊर्जेने भरतनेसुद्धा त्याला साथ दिलेली आहे. सिद्धार्थप्रमाणेच सर्वच पूर्वजांनी आपाल्या भूमिकेचं बेअरिंग शेवटपर्यंत पकडून ठेवलेलं आहे. यात क्रांती रेडकरचाही विशेष उल्लेख करायला हवा. इंटरव्हलनंतर तिची एंट्री होते, पण तिच्या भूमिकेतला करारीपणा नीट समजून तिने पठ्ठे बापूरावांची पोवळा साकारली आहे. म्हणजे तुलनेने लहान भूमिकेतही ती उठून दिसलीये. भरतने कमालीचा अभिनय केला आहेच, पण क्लायमॅक्समध्ये सर्व पूर्वज अंगात शिरल्यावर त्याने जो परफॉर्मन्स दिलाय तो आश्चर्यचकित करणारा आहे. याच सीनमध्ये सिनेमाला खो-खो हे नाव का दिलंय याचाही उलगडा होतो. 'खो-खो'ला रेटिंग - 60

  • Share this:

अमोल परचुरे, समीक्षक

31 मे

केदार शिंदेला फँटसीची आवड आहे हे तर सर्वांनाच माहित आहे. आधी नाटकांमधून आणि नंतर सिनेमांमधून फँटसी प्रकाराने त्याने प्रेक्षकांची भरपूर मनोरंजन केलंय. अर्थात, 'जत्रा' आणि 'अगं बाई अरेच्या'एवढा प्रतिसाद नंतर आलेल्या केदारच्या फँटसी सिनेमांना मिळू शकला नाही आणि म्हणूनच केदारने नव्या दमाने 'खो-खो' हा सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर केला. 'खो-खो' म्हणजेच 'लोच्या झाला रे' नाटक हे तर सर्वांना माहित आहेच. 'लोच्या झाला रे' नाटकात फँटसी तर होतीच पण रंगमंचीय शक्यतांचा कौशल्यानं विचार करुन एक वेगवान खेळ केदारने सादर केला होता. आता त्याच संकल्पनेवर सिनेमा तयार करताना यापूर्वीचा अनुभव केदारला उपयोगी पडलाय असं दिसतंय. एक खणखणीत कॉमेडी सिनेमाची भेट त्याने प्रेक्षकांना दिलेय असं नक्कीच म्हणता येईल.

काय आहे स्टोरी ?

'खोखो' सिनेमाचा नायक आहे भरत जाधव...आपल्या गावी असलेल्या वडिलोपार्जित वाड्यात तो राहायला येतो आणि संकटांची मालिकाच सुरु होते. आधी मेहता बिल्डरचे गुंड येऊन त्याला वाडा विकण्यासाठी धमकी देतात, मारहाण करतात आणि नंतर त्याला भेटायला येतात त्याचे पूर्वज, अगदी आदिमानवाच्या काळापासून... वाडा हे आपलं वैभव आहे.

ते आपल्या हातून जायला नको यासाठी ते नायकामध्ये लढाऊ वृत्ती जागवण्याचा प्रयत्न करत असतात. सर्वसामान्य माणूस असलेला नायक गपगुमान वाडा बिल्डरच्या हाती देण्याचा विचार करत असतो. आदिमानव ते संयुक्त महाराष्ट्र लढयातील नेता असे पूर्वज त्याचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत असतात आणि याचाच नायकाला त्रास होत असतो. बरं, हे सगळे पूर्वज फक्त नायकालाच दिसत असल्यामुळे त्यामुळे निर्माण होणारी गंमत आणखी वाढत जाते. नवीन काय ?

मूळ नाटकाशी या सिनेमाची तुलना करायची झालीच तर एवढंच सांगता येईल की, नाटकात असलेला वेग कायम राखण्यात केदारला अपयश आलंय. सिनेमा म्हटलं की, त्यात गाणी असलीच पाहिजेत असा विचार करायची गरज नव्हती. इंटरव्हलच्या आधी जेव्हा सिनेमा वाड्याबाहेर पडतो तेव्हा त्याचा वेग कमी होतो हेसुद्धा स्पष्टपणे जाणवतं.

सिनेमा पूर्णपणे फँटसीवर आधारित असला तरी फँटसीचंही काही लॉजिक असतं. जे सिनेमात काही ठिकाणी पटत नाही किंवा बर्‍याचे वेळा प्रश्नही पडायला लागतात. इंटरव्हलनंतर प्रत्येक व्यक्तिरेखा भाषण दिल्याच्या थाटात किंवा प्रबोधन केल्याप्रमाणे संवाद बोलत राहतो. याचमुळे इंटरव्हलनंतर सिनेमाची लांबीसुद्धा थोडी जास्त आहे असं वाटायला लागतं. पण या सगळ्या त्रुटी सोडल्या तरी परफॉर्मन्सवर हा सिनेमा बाजी मारुन जातो आणि क्लायमॅक्सला तर भरतच्या अभिनयाचा अद्भुत नमुना बघून सगळ्या त्रुटी विसरायला लावतो.

ऍक्टिंग -रिऍक्टिंग !

भरत जाधव आणि सिध्दार्थ जाधव हे या सिनेमाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. आदिमानवाच्या वेषात सिद्धार्थची एंट्री झाल्यानंतर पूर्ण सिनेमात त्याचा धुमाकूळ प्रचंड धमाल आणतो. त्याची ऊर्जा थक्क करणारी आहे आणि तेवढ्याच ऊर्जेने भरतनेसुद्धा त्याला साथ दिलेली आहे. सिद्धार्थप्रमाणेच सर्वच पूर्वजांनी आपाल्या भूमिकेचं बेअरिंग शेवटपर्यंत पकडून ठेवलेलं आहे.

यात क्रांती रेडकरचाही विशेष उल्लेख करायला हवा. इंटरव्हलनंतर तिची एंट्री होते, पण तिच्या भूमिकेतला करारीपणा नीट समजून तिने पठ्ठे बापूरावांची पोवळा साकारली आहे. म्हणजे तुलनेने लहान भूमिकेतही ती उठून दिसलीये. भरतने कमालीचा अभिनय केला आहेच, पण क्लायमॅक्समध्ये सर्व पूर्वज अंगात शिरल्यावर त्याने जो परफॉर्मन्स दिलाय तो आश्चर्यचकित करणारा आहे. याच सीनमध्ये सिनेमाला खो-खो हे नाव का दिलंय याचाही उलगडा होतो.

'खो-खो'ला रेटिंग - 60

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2013 05:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...