रिव्ह्यु : 'बॉम्बे टॉकीज' एक कलात्मक मनोरंजन

रिव्ह्यु : 'बॉम्बे टॉकीज' एक कलात्मक मनोरंजन

अमोल परचुरे, समिक्षक02 मेभारतीय सिनेमाची शताब्दी साजरी होत असताना मोठ्या पडद्याला सलामी देण्याचा दावा करण्यात आलाय बॉम्बे टॉकीजच्या निर्मात्यांकडून...सलामी वगैरे ठीक आहे, पण या सिनेमातला आशय आणि शेवटी येणारं गाणं पाहिलं तर ही केवळ बॉलीवूडला सलामी आहे असं म्हणता येईल. बॉलीवूड हा भारतीय सिनेमाचा एक भाग आहे. आणि बॉलीवूड म्हणजेच भारतीय सिनेमा हे समीकरण चूक आहे हेच विसरलेल्या लोकांनी एकत्र येऊन बॉम्बे टॉकीजची निर्मिती केलेली आहे. एवढी एक गोष्ट सोडली तर या सिनेमावर टीका करण्यासारखं फारसं काही नाही. नव्या प्रवाहाचे सिनेमे बनवणार्‍या चार दिग्दर्शकांनी यात चार कथा सादर केल्या आहेत. थोडक्यात, चार शॉर्ट फिल्म्स एकत्र करण्यात आलेल्या आहेत. या कथांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. संबंध असलाच तर तो बॉलीवूडशी आहे. फिल्मी दुनियेचा भारतीय मनांवर खोलवर असलेला परिणाम या चार कथांमधून सादर करण्यात आलेला आहे. करण जोहर, दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि अनुराग कश्यप या चार दिग्दर्शकांनी बॉम्बे टॉकीजला आकार दिलाय. बॉम्बे टॉकीज हे एका फिल्म स्टुडिओचं नाव आहे. ज्याची स्थापना 1934 मध्ये झाली होती. या बॉम्बे टॉकीज स्टुडिओनं 104 सिनेमांची निर्मिती केली होती. अर्थात, या सगळ्या इतिहासाचा या सिनेमाशी काहीही संबंध नाही. पण या स्टुडिओचं नाव अतिशय चपखलपणे वापरण्यात आलेलं आहे. इथे टॉकीजचा संबंध फिल्मी थिएटरशी आहे. सिनेमा बघणं हे पाप समजलं जायचं. अगदी तेव्हापासून आतापर्यंत या थिएटरचं महत्त्व अबाधित आहे. मोठ्या पडद्यावर स्टार्सना बघून त्यांच्यासारखं वागण्याची, बोलण्याची, त्यांची स्टाईल मारण्याची परंपरा खूप जुनी आहे. अगदी या आधुनिक काळातही सिनेमाचा प्रभाव रोजच्या जगण्यात जाणवतोय. हाच धागा पकडून चारही दिग्दर्शकांनी आपापल्या कथा गुंफलेल्या आहेत. फिल्मी न्यूजपेपरचं ऑफिस, न्यूज चॅनलचा स्टुडिओ, गिरणगावातली चाळ, करिअर घडवणारी शाळा, अलाहाबादमधलं गाव अगदी सगळ्या ठिकाणी म्हणजेच उच्चभ्रू वर्गापासून तळागाळापर्यंत सिनेमाची जादू किती गडद आहे हे दाखवण्याचा प्रयत्न चारही शॉर्ट फिल्ममधून करण्यात आलाय.चारही दिग्दर्शक हे तसे म्हटले तर कमर्शिअल आहेत. अनुराग कश्यपने यापूर्वी अनेक शॉर्टफिल्मचं दिग्दर्शन केलंय. त्यामुळे त्याच्या फिल्ममधला वास्तववाद ठळकपणे जाणवतो. बाकी सिनेमे हे थोडे फिल्मी ढंगाचे असले तरी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न सर्वच दिग्दर्शकांनी केलेला आहे. आर्थिक गणितं बांधून सिनेमे करताना जे करता येत नाही ते वेगळेपण त्यांनी सादर केलंय. या चारही सिनेमात उठून दिसते ती दिबाकर बॅनर्जीची फिल्म...ज्या शहरात सिनेमा वाढला आणि बहरला त्या शहरातल्या गरीब मराठी माणसाची व्यथा इथे दिसते. आर्थिक विवंचना आहेच पण त्यापेक्षाही आपण आपल्यातील कलाकार घडवू शकलो नाही याची खंतही आहे. नवाझुद्दीन सिद्दिकी या कलाकाराने अभिनयाची कमाल पुन्हा एकदा दाखवलेली आहे. आत्मा सिनेमात दिसलेला अगदी तसाच नवाझुद्दीन, पण या सिनेमात तो मराठी माणूस वाटतो. केवळ मराठी भाषेत बोलणंच नाही तर मराठी माणसाच्या लकबीसुद्धा त्याने अचूक पकडलेल्या आहेत. फक्त नवाझच नाही तर चारही फिल्ममध्ये सर्वच कलाकारांनी अप्रतिम काम केलेलं आहे. चार सिनेमे वेगवेगळ्या दिग्दर्शकांचे असले तरी सिनेमॅटोग्राफी राजीव रवी यांचीच आहे. याचा एक फायदा म्हणजे सर्व कथांचा लूक एकसारखा राहिलाय. सगळं काही जुळून आलंय पण तरी एक गोष्ट सांगावीशी वाटते. फेस्टिव्हल सिनेमांचा जो प्रेक्षक आहे. त्याच्यासाठी या बॉम्बे टॉकीजमध्ये फारसं नावीन्य नाही आणि दबंगसारख्या सिनेमांचा प्रेक्षक पूर्ण सिनेमा पाहू शकेल असं वाटत नाही. ही कोंडी जर फोडता आली तरच या सिनेमाला प्रेक्षकांची गर्दी होईल.'बॉम्बे टॉकीज'ला रेटिंग - 75

  • Share this:

अमोल परचुरे, समिक्षक

02 मे

भारतीय सिनेमाची शताब्दी साजरी होत असताना मोठ्या पडद्याला सलामी देण्याचा दावा करण्यात आलाय बॉम्बे टॉकीजच्या निर्मात्यांकडून...

सलामी वगैरे ठीक आहे, पण या सिनेमातला आशय आणि शेवटी येणारं गाणं पाहिलं तर ही केवळ बॉलीवूडला सलामी आहे असं म्हणता येईल.

बॉलीवूड हा भारतीय सिनेमाचा एक भाग आहे. आणि बॉलीवूड म्हणजेच भारतीय सिनेमा हे समीकरण चूक आहे हेच विसरलेल्या लोकांनी एकत्र येऊन बॉम्बे टॉकीजची निर्मिती केलेली आहे. एवढी एक गोष्ट सोडली तर या सिनेमावर टीका करण्यासारखं फारसं काही नाही. नव्या प्रवाहाचे सिनेमे बनवणार्‍या चार दिग्दर्शकांनी यात चार कथा सादर केल्या आहेत.

थोडक्यात, चार शॉर्ट फिल्म्स एकत्र करण्यात आलेल्या आहेत. या कथांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. संबंध असलाच तर तो बॉलीवूडशी आहे. फिल्मी दुनियेचा भारतीय मनांवर खोलवर असलेला परिणाम या चार कथांमधून सादर करण्यात आलेला आहे.

करण जोहर, दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि अनुराग कश्यप या चार दिग्दर्शकांनी बॉम्बे टॉकीजला आकार दिलाय. बॉम्बे टॉकीज हे एका फिल्म स्टुडिओचं नाव आहे. ज्याची स्थापना 1934 मध्ये झाली होती. या बॉम्बे टॉकीज स्टुडिओनं 104 सिनेमांची निर्मिती केली होती. अर्थात, या सगळ्या इतिहासाचा या सिनेमाशी काहीही संबंध नाही. पण या स्टुडिओचं नाव अतिशय चपखलपणे वापरण्यात आलेलं आहे.

इथे टॉकीजचा संबंध फिल्मी थिएटरशी आहे. सिनेमा बघणं हे पाप समजलं जायचं. अगदी तेव्हापासून आतापर्यंत या थिएटरचं महत्त्व अबाधित आहे. मोठ्या पडद्यावर स्टार्सना बघून त्यांच्यासारखं वागण्याची, बोलण्याची, त्यांची स्टाईल मारण्याची परंपरा खूप जुनी आहे. अगदी या आधुनिक काळातही सिनेमाचा प्रभाव रोजच्या जगण्यात जाणवतोय. हाच धागा पकडून चारही दिग्दर्शकांनी आपापल्या कथा गुंफलेल्या आहेत.

फिल्मी न्यूजपेपरचं ऑफिस, न्यूज चॅनलचा स्टुडिओ, गिरणगावातली चाळ, करिअर घडवणारी शाळा, अलाहाबादमधलं गाव अगदी सगळ्या ठिकाणी म्हणजेच उच्चभ्रू वर्गापासून तळागाळापर्यंत सिनेमाची जादू किती गडद आहे हे दाखवण्याचा प्रयत्न चारही शॉर्ट फिल्ममधून करण्यात आलाय.

चारही दिग्दर्शक हे तसे म्हटले तर कमर्शिअल आहेत. अनुराग कश्यपने यापूर्वी अनेक शॉर्टफिल्मचं दिग्दर्शन केलंय. त्यामुळे त्याच्या फिल्ममधला वास्तववाद ठळकपणे जाणवतो. बाकी सिनेमे हे थोडे फिल्मी ढंगाचे असले तरी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न सर्वच दिग्दर्शकांनी केलेला आहे. आर्थिक गणितं बांधून सिनेमे करताना जे करता येत नाही ते वेगळेपण त्यांनी सादर केलंय.

या चारही सिनेमात उठून दिसते ती दिबाकर बॅनर्जीची फिल्म...ज्या शहरात सिनेमा वाढला आणि बहरला त्या शहरातल्या गरीब मराठी माणसाची व्यथा इथे दिसते. आर्थिक विवंचना आहेच पण त्यापेक्षाही आपण आपल्यातील कलाकार घडवू शकलो नाही याची खंतही आहे. नवाझुद्दीन सिद्दिकी या कलाकाराने अभिनयाची कमाल पुन्हा एकदा दाखवलेली आहे. आत्मा सिनेमात दिसलेला अगदी तसाच नवाझुद्दीन, पण या सिनेमात तो मराठी माणूस वाटतो.

केवळ मराठी भाषेत बोलणंच नाही तर मराठी माणसाच्या लकबीसुद्धा त्याने अचूक पकडलेल्या आहेत. फक्त नवाझच नाही तर चारही फिल्ममध्ये सर्वच कलाकारांनी अप्रतिम काम केलेलं आहे. चार सिनेमे वेगवेगळ्या दिग्दर्शकांचे असले तरी सिनेमॅटोग्राफी राजीव रवी यांचीच आहे. याचा एक फायदा म्हणजे सर्व कथांचा लूक एकसारखा राहिलाय.

सगळं काही जुळून आलंय पण तरी एक गोष्ट सांगावीशी वाटते. फेस्टिव्हल सिनेमांचा जो प्रेक्षक आहे. त्याच्यासाठी या बॉम्बे टॉकीजमध्ये फारसं नावीन्य नाही आणि दबंगसारख्या सिनेमांचा प्रेक्षक पूर्ण सिनेमा पाहू शकेल असं वाटत नाही. ही कोंडी जर फोडता आली तरच या सिनेमाला प्रेक्षकांची गर्दी होईल.

'बॉम्बे टॉकीज'ला रेटिंग - 75

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2013 05:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading