राज्य सरकारचे चित्रपट पुरस्कार जाहीर

राज्य सरकारचे चित्रपट पुरस्कार जाहीर

23 एप्रिलमुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे चित्रपट पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर यांना तर राज कपूर विशेष जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक बासू चटर्जी यांना जाहीर झाला आहे. तर व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री रिमा यांना जाहीर झालाय. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते नाना पाटेकर यांना घोषित झाला आहे. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी पाच लाख रुपये, मानपत्र,सन्मानचिन्ह आहे. तर व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राज कपूर विशेष योगदार पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी तीन लाख रुपये,मानपत्र,सन्मानचिन्ह असं आहे. हे पुरस्कार 2 मे रोजी रवींद्र नाट्य मंदिर,प्रभादेवी येथे आयोजित चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रदान केले जाणार आहेत.

  • Share this:

23 एप्रिल

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे चित्रपट पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर यांना तर राज कपूर विशेष जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक बासू चटर्जी यांना जाहीर झाला आहे. तर व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री रिमा यांना जाहीर झालाय. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते नाना पाटेकर यांना घोषित झाला आहे. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी पाच लाख रुपये, मानपत्र,सन्मानचिन्ह आहे. तर व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राज कपूर विशेष योगदार पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी तीन लाख रुपये,मानपत्र,सन्मानचिन्ह असं आहे. हे पुरस्कार 2 मे रोजी रवींद्र नाट्य मंदिर,प्रभादेवी येथे आयोजित चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रदान केले जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2013 04:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...