सलमान करणार मानुषी छिल्लरला बाॅलिवूडमध्ये लाँच

सलमान करणार मानुषी छिल्लरला बाॅलिवूडमध्ये लाँच

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला सिनेमात कास्ट करण्यासाठी बॉलिवूडच्या अनेक निर्मात्यांची धडपड सुरू आहे. बॉलिवूडचा दबंग खान सलमाननेही मानुषीसोबत सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केलीये.

  • Share this:

30 नोव्हेंबर : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला सिनेमात कास्ट करण्यासाठी बॉलिवूडच्या अनेक निर्मात्यांची धडपड सुरू आहे. बॉलिवूडचा दबंग खान सलमाननेही मानुषीसोबत सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केलीये.सलमानचा मेव्हणा आयुष शर्माला बाॅलिवूडमध्ये लाँच करायचे. त्यासाठी त्याला फ्रेश चेहरा हवाय. आणि मानुषी चांगला चाॅइस असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

सलमान नेहमीच बॉलिवूडमध्ये नवा चेहरा लाँच करत असतो. त्यामुळेच त्याला मानुषीलाही त्याच्या सिनेमात कास्ट करण्याची इच्छा आहे. मात्र मानुषीने तिला आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा असल्याचं म्हटलंय. त्यामुळेच मानुषी आता नक्की कोणत्या स्टारसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करते ते पाहणं औत्सुक्याचं ठरणारे.

First published: November 30, 2017, 7:22 PM IST

ताज्या बातम्या