दीपिका पादुकोणच्या परफॉर्मन्सवर खूश होऊन भन्साळींनी दिलं 'हे' गिफ्ट

दीपिका पादुकोणच्या परफॉर्मन्सवर खूश होऊन भन्साळींनी दिलं 'हे' गिफ्ट

सुत्रांच्या माहितीनुसार तर भन्साळी कोणाला बक्षीस फार कमी वेळाच देतात. त्यामुळे दीपिकासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की तिच्या परफॉर्मन्समुळे निर्माते इतके खुश झाले.

  • Share this:

27ऑक्टोबर: पद्मावती सिनेमातलं दीपिका पदुकोणचं 'घूमर' गाणं आणि त्यातला दीपिकाचा डान्स सध्या चांगलाच गाजतोय. एका बाजूला, या गाण्यातील लहानसहान गोष्टींची चर्चा होतेय तर दुसऱ्या बाजूला दीपिका पदुकोणचा रॉयल लुक सगळ्यांच्या भुवया उंचावणारा आहे. तिचा डान्सची तिच्या चाहत्यांमध्ये वाह वाह होते आहे.म्हणूनच की काय संजय लीला भन्साळींनी दीपिकाला तिच्या आवडता पद्मावती ड्रेस बक्षीस म्हणून दिलाय.

सिनेनिर्माते संजय लीला भन्साळीसुद्धा दीपिकाच्या दीपिकाच्या डान्सला चांगलेल भूलले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार तर भन्साळी कोणाला बक्षीस फार कमी वेळाच देतात. त्यामुळे दीपिकासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की तिच्या परफॉर्मन्समुळे निर्माते इतके खुश झाले.

ज्या गाण्यावर भन्साळी इतके खुश आहेत त्या गाण्यातील भन्साळी टच आणि त्यांची आयडिओलॉजी सहज दिसते. दीपिकासह नाचणाऱ्या इतर नर्तकांमुळेही हे गाणं आणखी भव्य आणि सुंदर दिसतं.

First Published: Oct 29, 2017 08:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading