S M L
  • 'देऊळ'चं 'वेलकम' हिट !

    आईबीएन लोकमत | Published On: Oct 19, 2011 05:42 PM IST | Updated On: Oct 19, 2011 05:42 PM IST

    19 ऑक्टोबरवळू, आणि विहीर या सिनेमानंतर दिग्दर्शक उमेश कुलकर्णी देऊळ हा सिनेमा घेऊन येतोय. येत्या चार नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय. नाना पाटेकर-दिलीप प्रभावळकर यांच्या जोडीबरोबरच या सिनेमातीलं आकर्षण बनलंय ते यातलं आयटम नंबर. अभिनेत्री स्मिता तांबेवर चित्रित झालेलं आणि उर्मिला धनगरच्या आवाजात सूरबद्ध झालेलं वेलकम...हे आयटम नंबर. देऊळ या सिनेमातील हे आयटम नंबर इतर आयटम साँगसारखं फक्त सिनेमात गेस्ट अपिअरन्स किंवा जागा भरण्यासाठी येत नाही तर त्यातनं सिनेमाला महत्वाचं वळण मिळतं. देऊळ उभारण्याची सुरुवात या आयटम नंबरपासून होते. हे आयटम नंबर लिहीलंय स्वानंद किरकिरे यानी. काही तरी कॅची असण्यापेक्षा अर्थपुर्ण पण तरीही ठसकेबाज लिहावे ही कल्पना या गाण्यामागची होती. वळू असू दे किंवा विहीर सिनेमा आत्तापर्यंत उमेशच्या या दोनही सिनेमांमध्ये गाण्यांपेक्षा उत्कृष्ट पार्श्वसंगीत पहायला मिळालं होतं. पण पहिल्यांदाच देऊळमध्ये वेगवेगळ्या धाटणीची गाणी समाविष्ट केली गेली. मग ते किर्तन असू दे रॅप असू दे किंवा हे आयटम नंबर...यातनं उमेशने बोथट होत चाललेल्या सामाजिक जाणीवा मांडल्यात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close