मुंबईत झाला संगीतकला केन्द्र पारितोषिक सोहळा

17 नोव्हेंबर, मुंबई -भाग्यश्री वंजारी भारतीय संगीताला प्रोत्साहन देणारे संगीतकला केन्द्र पुरस्कार काल मुंबईत देण्यात झाले. ज्येष्ठ संगीतकार पंडित विजय राघव राव यांना कला शिखर पुरस्कारानं तर युवा बासरी वादक राकेश चौरसियाला आणि संतुर वादक पूर्बायन चॅटर्जी याला आदित्य बिर्ला कलाकिरण पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं.दिवंगत उद्योगपती आदित्य विक्रम बिर्ला यांच्या स्मरणार्थ दरवर्षी संगीत कला अ‍ॅवॉर्ड दिले जातात. संगीत क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या कलाकारांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. दरवर्षी ज्येष्ठ कलाकाराला गौरवणार्‍या या पुरस्कारामध्ये यावर्षी मात्र काही बदल करण्यात आलेय .यावेळी जेष्ठ कलाकारांबरोबरच दोन तरूण नव्या उमेदीच्या कलाकारांना प्रोत्साहन देणारे पुरस्कार दिले गेले. यात जेष्ठ कलाकारांसाठी पंडीत विजय राघव राव तर दोन युवा कलाकारांसाठी राकेश चौरसिया आणि पूर्बायन चॅटर्जी यांची निवड झाली. राज्यपाल एस्. सी .जमीर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. संगीत कला केंन्द्रच्या संचालिका राजश्री बिर्लाही यावेळी उपस्थित होत्या

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 17, 2008 12:58 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2008 12:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...