Article 370 वर तीनही खानांची 'अळीमिळी गुपचिळी'

Article 370 वर तीनही खानांची 'अळीमिळी गुपचिळी'

बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टारने या प्रकरणी गप्प राहणं पसंत केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट- जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. सर्वसामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटी प्रत्येकजण या निर्णयाचीच चर्चा करताना दिसत आहे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत हा प्रस्ताव मांडला. या निर्णयाचा काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाने याला कडाडून विरोध केला. सर्व सामान्य लोकांकडून या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. अनेकांनी हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचंही म्हटलं. या सगळ्यात बॉलिवूडमधून मात्र फार कमी लोकांकडून या निर्णयावर प्रतिक्रिया आली आहे. बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टारने या प्रकरणी गप्प राहणं पसंत केलं आहे.

Article 370 ने भडकल्या पाकिस्तानी अभिनेत्री, म्हणाल्या- ‘स्वर्ग जळतोय आणि आपण..'

सरकारच्या या निर्णयानंतर अनुपम खेर, परेश रावल, अशोक पंडित, कंगना रणौतसह अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. मात्र बॉलिवूडचे तीन मोठे सुपरस्टार सलमान खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, आमिर खान, रणवीर सिग, दीपिका पदुकोण, स्वरा भास्कर, जावेद अख्तर, शबाना आझमी, सनी देओल, हृतिक रोशन, अनुष्का शर्मा अशा अनेक स्टार्सनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

ANI ला दिलेल्या एका मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले की, ‘आजचा दिवसाची गणना भारताच्या इतिहासात होईल. मोदी सरकारने जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटवलं आहे. एक काश्मिरी होण्याच्या नात्याने हे सगळं माझ्या डोळ्यासमोर होताना पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे. 370 हा एक कर्करोग होता. ज्याच्यावर आता उपचार झाला आहे.’

आजही हे सिनेमे पाहिले तर तुम्ही पुन्हा काश्मीरच्या प्रेमात पडाल!

परेश रावल यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर करत या निर्णयाचं स्वागत केलं. परेश यांनी जो फोटो शेअर केला त्यावर कॅप्शन देत म्हटलं की, ‘तुम्हाला अनेक सलाम’ या फोटोत तरुणपणातील मोदी दिसत आहेत. त्यांच्या मागे एक बॅनरही दिसत आहे. या बॅनरवर कलम 370 हटवा, दहशकवाद मिटवा, देश वाचवा... चला काश्मीर असा संदेश लिहिलेला दिसत आहे. परेश यांनी जो फोटो शेअर केला त्यात ठळक कलम 370 शब्दाला रेखांकित केलं आहे. परेश रावल यांच्या मते, मोदी यांनी अनेक वर्षांपूर्वी कलम 370 हटवण्याचा पण केला होता.

‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा’ या 11 डायलॉगने काढली पाकची इज्जत

कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर लिहिलं की, ‘देशाला दहशतवादापासून दूर करण्यासाठी 370 कलम हटवणं गरजेचं होतं. अनेक वर्षांपासून मी यावर बोलत आहे. मला माहीत होतं की, कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होईल ती पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच. त्यांच्याकडे फक्त दुरदृष्टीच नाहीये तर गोष्टी बदलण्याची ताकदही त्यांच्यात आहे. जम्मू- काश्मीरसहित संपूर्ण भारतीय नागरिकांना या ऐतिहासिक दिवसाच्या शुभेच्छा.’

करून दाखवलं! 27 वर्षांपूर्वीच मोदींनी 370 हटवण्याचा केला होता पण

SPECIAL REPORT: अमित शाह आणि भाजप विरोधकांच्या फार पुढे गेले!

Published by: Madhura Nerurkar
First published: August 6, 2019, 12:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading