बॉलिवूड अभिनेता म्हणाला, 'आता काश्मिरी मुलीशी लग्न करेन आणि तिथे बंगला बांधून आयुष्य काढेन'

बॉलिवूड अभिनेता म्हणाला, 'आता काश्मिरी मुलीशी लग्न करेन आणि तिथे बंगला बांधून आयुष्य काढेन'

‘भारताकडे कधीही अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासारखा चतूर नेता नसेल. दोघंही मैत्रीचं उत्तम उदाहरण आहे.’

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट- राज्यसभेत सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 रद्द करत जम्मू- काश्मीर राज्याचा पुनर्रचनेचा प्रस्ताव मांडला. या बातमीमुळे ऑगस्टमध्ये अनेक राज्यात दिवाळी साजरी करण्यात आली. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं तर असेही काही लोक होते जे या निर्णयला कडाडून विरोध करत आहेत. दरम्यान, जम्मू- काश्मिरच्या सद्य स्थितीवर स्वयंघोषित सिनेसमिक्षक कमाल आर खानने प्रतिक्रिया दिली आहे. केआरकेने ट्वीट करत म्हटलं की, ‘आता जर कोणती सुंदर काश्मिरी मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार असेल तर मी तिकडे एक मोठा बंगला विकत घ्यायला तयार आहे. चला आता जमिनीवरील स्वर्गात एक सुंदर आयुष्य जगू.’

कमालने त्याच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘मला मोदी सरकार आवडत नव्हती. कारण त्यांनी कधीच दिलेली वचनं पूर्ण केली नाहीत. पण आता हे सरकार मला आवडू लागलं आहे. कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे कलम 370 रद्द केलं. मला ते अजून आवडतील जर ते राम मंदिर बांधायचं वचन पूर्ण करतील. कारण लोकांनी त्यांना त्यांच्या वचनांसाठीच मत दिलं आहे.’

कमालने पुढे लिहिले की, ‘लोकांनी काश्मीर प्रकरणी मुस्लिम बांधवांवर संशय घेऊ नये. एकही मुस्लिम बांधव कलम 370 हटवण्याच्या विरोधात नाही. मुस्लिमांनाही काश्मीरमध्ये मालमत्ता विकत घेण्याचा अधिकार नाहीये. एवढंच काय तर मुस्लिमांना काश्मिरी मुलींशी लग्न करण्याचाही अधिकार नाहीये. याचा अर्थ असा की काश्मिरी मुस्लीम आम्हालाही पसंत करत नाहीत.’

कमाल राशिद खानने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं कौतुक करत म्हटलं की, ‘भारताकडे कधीही अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासारखा चतूर नेता नसेल. दोघंही मैत्रीचं उत्तम उदाहरण आहे.’

असं असलं तरी लोकांनी कमालच्या ट्वीटची थट्टाच उडवली आहे. एका युझरने लिहिले की, ‘काश्मिरी मुली जे मुस्लिम नाहीत त्यांच्याशी लग्न करत नाहीत.’ तर अजून एका युझरने लिहिले की, ‘महबूबा मुफ्ती यांना प्रपोज करायची तुझी हिंमत कशी झाली.’

Article 370 ने भडकल्या पाकिस्तानी अभिनेत्री, म्हणाल्या- ‘स्वर्ग जळतोय आणि आपण..'

Article 370 वर तीनही खानांची 'अळीमिळी गुपचिळी'

‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा’ या 11 डायलॉगने काढली पाकची इज्जत

SPECIAL REPORT: अमित शाह आणि भाजप विरोधकांच्या फार पुढे गेले!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 01:36 PM IST

ताज्या बातम्या